Ajay Kandewar,Wani:- कुणाल निळकंठ आडे (35) व्यवसाय -तलाठी (सावर्ला साजा) रा. ड्रीम लँडसिटी गणेशपुर ,वणी ह.मु. विठ्ठलवाडी वणी ता. वणी जि. यवतमाळ यांच्या घराजवळ लावलेली चारचाकी गाडी टाटा पंच कार क्रमांक (MH-29-BV-4662)कोणी अज्ञाताने फोडल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री झोपून असताना ही घटना घडली.

कुणाल आडे यांच्या घरासमोरील दरात लावलेल्या चार चाकी गाडीचे अज्ञात व्यक्तीने रात्री एकच्या सुमारास काचा फोडल्या. यात गाडी मालकाचे काहीं नुकसान झाले . त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या परिसरात सीसीटीव्ही तपासणे सूरू आहेत. दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. मात्र त्या हल्लेखोरांनी “कुणाल” चा गाडीवर का हल्ला केला असावा , त्याची काही आतमधून काही कुणाशी संबध चांगले /वांगले होतें काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.

