Ajay Kandewar:- रेती उत्खनात कमी कालावधीत अमाप पैसा मिळत असल्याने गेल्या काही दिवसात रेती चोरी करणाऱ्याचे प्रमाण एवढे वाढले कि, प्रत्येक जण या व्यवसायात येण्याची स्पर्धाच सुरू आहे. त्यात तो “ज…यंत” व “कु….णाल” त्या चोरट्यांचे हस्तक बनले असल्याचे चित्रं सध्या ऐकू येत आहे.या हस्तकांचा आशीर्वादाने अवैध रेतीचा उपसा प्रचंड प्रमाणावर होत आहे ,असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

शासनाचे नियम पायदळी तुडवत रात्रभर रेती घाटावरून दररोज रात्री हजारो ब्रास रेतीची चोरी करू देण्यास त्या दोन खादाडांचा डाव सक्सेस होत आहे यामुळें शासनाचा करोडोचा महसूल बुडत आहे. व्यवसायात अडथळा “ज…यंत” व “कु….णाल” यांच्या महिन्याकाठी लाखोंची आर्थिक देवान घेवाण संगनमत करून हा व्यवसाय मोठ्या जोमात ठेवण्यात आला आहे अशी गावकऱ्यात बोंब आहे. एवढेच नाही तर एखादे वेळी रेती तस्कराचे वाहन मिळाले तरी आर्थिक स्वार्थापोटी “ते दोन खादाड ” मैं हुं ना….. जाणें दे ना “…अस ही म्हणत असल्याचं विदारक चित्रं ऐकू यायला सूरुवात झाली आहे पण यात “ज…यंत” व “कु….णाल” यांच्या बॉस “विवेकबुद्धी”ने “एडा बनके पेढा खात” असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.

