अजय कंडेवार,वणी:- केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विहित निकषानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात असे पोलीस महासंचालक यांना सुचवले होते. त्यानुसार वणी येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांची अमरावती परिक्षेत्रातील अकोला येथे झाल्याने वणी पोलीस स्टेशनचे नवीन शिलेदार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांच्याकडे वणी पोलीस स्टेशनचे सूत्र सोपविले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार असलेले पो. नि अनिल बेहरानी यांनी शनिवार 3 फेब्रुवारी रोजी वणी ठाणेदार पदाचे सूत्र स्वीकारले.
पीआय अजित जाधव अतिशय शांत, हसमुख, मनमिळावू शिस्तप्रिय,सुस्वभावी, कुणाच्याही दबावाला बळी न पडणारे अधिकारी म्हणून त्यांची वणी उपविभागात ओळख होती. मध्यंतरी वणी शहरात घरफोडी, दुकानफोडी व चोऱ्यांचे सत्र सुरु झाले होते. शहरात अज्ञात चोरट्यानी एकाच रात्री जवळपास अनेक दुकाने फोडली होती.त्यामुळे शहरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली होती.अश्यातच पी.आय अजित जाधव यांची वणी ठाण्यात बदली होताच चोरीच्या घटनांत व अनेक गुन्हे मोठ्या प्रमाणात अंकुश लागला होता.अजित जाधव शांत स्वभावाचे व रॉयल ठाणेदार म्हणून चांगलीच छाप सोडली आहे व अवैध धंदे,चोऱ्या व गुन्हे यावर मोठ्या प्रमाणात आवरही घातला.पीआय अजित जाधव यांनी कर्मचारी यांना आपल्या परिवारातील “एक सदस्य ” म्हणूनच त्यांच्याशी वागणुक ठेवली हे विशेष… काही दिवसातच आपले बनलेले अधिकारी यांचा बदलीने ठाण्यातही भावूकता दिसून आली. अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याशी कसे वागावे ? असाही धडा त्यांनी शिकवला असेही म्हणायला काहीच हरकत नाहीं. अश्यातच जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांना जिल्हा बदलीचे आदेश धडकल्याने कर्मचारी यांना देखील शॉकच बसला.मात्र बदलीचे आदेश आल्याने त्यांचे कार्य अपूर्ण राहीले.
बदलीचे आदेश नसते तर अजित जाधव हे त्यांचा सेवेचा कालावधी नक्कीच पुर्ण केला असता यात तीळमात्र शंका नव्हती.तरीही जाता जाता शिवमहापुरान च्या चोख बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था अतिशय जबाबदारीने यशस्वीरीत्या हाताळले.वणीच्या ठाणेदारपदी कोणाची वर्णी लागणार याच्याकडे वणीकरांचे लक्ष असतांनाच अनिल बेहरानी यांची वर्णी लागली.नव्याने रूजू होणारे ठाणेदार पी आय अनिल बेहरानी अशाच प्रकारे कामगिरी करतील अशी आशा वणीकर जनतेला लागली आहे.
” जिल्ह्यात वणी पोलीस ठाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. येथील प्रभार मिळावा याकरिता अधिकारी आपापल्या पद्धतीने “फिल्डिंग” लावतात. मात्र मागील काही वर्षापासून अधिकाऱ्यांना ठाणेदारपदी अल्पकालावधी मिळाल्याचे दिसून येत आहे. नव्यानेच आलेल्या ठाणेदार अनिल बेहराणी यांना प्रथमतः बिट निहाय माहिती संकलित करून अवैद्यधंद्याचे समूळ उच्चाटन करण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.नव्याने रूजू होणारे ठाणेदार पी आय अनिल बेहरानी अशाच प्रकारे कामगिरी करतील अशी आशा वणीकर जनतेला लागली आहे.”
पी.आय अजित जाधव यांची कामगिरी….
“यवतमाळ येथे गून्हे परिषदमध्ये मागील महिन्यात विविध हेडखाली सर्वात चांगली कामगिरी करणारे पोलीस स्टेशन यांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.अवैध धंदे,चोऱ्या व गुन्हे यावर मोठ्या प्रमाणात आवर घातला. मोठ-मोठे चोरीचे गुन्हे उघड केलें.अनेक धडाकेबाज कारवाया केल्या. अनेक मोठ मोठ्या गुन्हातील आरोपींचा मुसक्या दाबल्या व अनेक आरोपींना जेरबंद केले.”