Ajay Kandewar,Wani :आगामी २०२४ विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहर व ग्रामीण भागातील जातीय सलोखा कायम राहावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यादृष्टीने पोलीस अधीक्षक डॉ . कुमार चिंता वणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचा मार्गदर्शनाखाली वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांच्या नेतृत्वाखाली 6 नोव्हेबर ला सकाळी 10.00 वाजता राजूर ओ.पी येथील पंचशील वॉर्ड – कॉर्टर ७५- कॉर्टर १२० – बूथ मार्ग – वॉर्ड नंबर 2 – वॉर्ड नंबर 3 ते भगतसिंग चौका या मार्गात वणी पोलिसांनी पथसंचलन केले.
यावेळी पोलिसांची फौज शहरातील अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भागासह शहरातील तसेच ग्रामीण भागात प्रमुख मुख्य मार्गावरून पथसंचलन करीत पोलीस स्टेशनला सांगता करण्यात आली. या पथसंचलनात केंद्रीय पोलिस दलाचे जवान, होमगार्ड, दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलाचे जवान,असे एकूण ६३ संख्याबळ त्यात ०६ अधिकारी, सी आर पी एफ ३२ तर २५ पोलीस अंमलदारांचा समावेश होता.