•अनेकांचे दणाणले धाबे….
अजय कंडेवार,वणी:- गेल्या काही महिन्यांपूर्वी वणी पोलीस ठाण्यात रुजू झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक यांनी धडक कारवाया सुरू केल्या आहेत. परिणामी अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
वणी पोलीस ठाण्यात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. यात अल्पवयीन बालिका, संशयास्पद मृत्यू असे प्रकरणे आहेत.येथील काही अधिकाऱ्यांनी गंभीर प्रकरणे असतांना केवळ सोपं स्वरूप देत चांगभलं केल्याचा वावड्या पण मागील काळात उठल्या आहेत. यातच काही महिन्यांपूर्वी वणी ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलिस निरीक्षक यांनी अनेक प्रकरणे हातात घेतली असल्याची माहिती आहे.
प्रामाणिक नोकरी हे ब्रीद घेऊन येणाऱ्या या अधिकाऱ्याने शहरातील अवैध व्यवसायावर वचक निर्माण केल्याचे दिसते आहे. शहरात चालणारा मटका, जुगार,नियमबाह्य उघडणारी दारू दुकाने यांना तंबी सुद्धा दिली आहे. अनेक अवैध व्यवसाय सध्यातरी कमी झाल्याचे दिसते आहे. आता अनेक प्रलंबित गंभीर प्रकरणे वणी पोलीस शोधून काढणार का?हाच खरा प्रश्न आहे. मात्र शहरात सहायक पोलीस उपनिरीक्षक माधव शिंदेच्या व त्यासोबतच अनेकांचा नावाची चर्चा जोरदार आहे.