Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsवणीत नमो युवा रन ,नशामुक्त भारतासाठी मॅरेथॉन स्पर्धा....

वणीत नमो युवा रन ,नशामुक्त भारतासाठी मॅरेथॉन स्पर्धा….

•भाजपा शहर अध्यक्ष अॅड निलेश चौधरी यांचे आवाहन.

Ajay kandewar,Wani – सेवा पंधरवड्याच्या उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी, वणी विधानसभा तर्फे “नमो युवा रन – नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धा” गुरुवार, दि. २५ सप्टेंबर रोजी भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने युवक-युवतींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपा शहर अध्यक्ष अॅड. निलेश चौधरी यांनी केले आहे.सकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच लोकमान्य टिळक चौक येथून या मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

स्पर्धेचे गट व बक्षिसे…..

🔹 गट – अ (१६ वर्षाखालील मुले व मुली, २.५ कि.मी.)

प्रथम क्रमांक : ₹३,००० व सन्मानचिन्ह

द्वितीय क्रमांक : ₹२,००० व सन्मानचिन्ह

तृतीय क्रमांक : ₹१,००० व सन्मानचिन्ह तसेच प्रत्येकी ३ प्रोत्साहनपर बक्षिसे

🔹 गट – ब (१६ वर्षावरील मुले – ३.५ कि.मी.)

प्रथम क्रमांक : ₹५,००० व सन्मानचिन्ह,

द्वितीय क्रमांक : ₹३,००० व सन्मानचिन्ह

तृतीय क्रमांक : ₹२,००० व सन्मानचिन्ह तसेच ३ प्रोत्साहनपर बक्षिसे

🔹 गट – ब (१६ वर्षावरील मुली – ३.५ कि.मी.)

 

प्रथम क्रमांक : ₹३,००० व सन्मानचिन्ह

द्वितीय क्रमांक : ₹२,००० व सन्मानचिन्ह

तृतीय क्रमांक : ₹१,००० व सन्मानचिन्ह तसेच ३ प्रोत्साहनपर बक्षिसे

नियमावली

1. स्पर्धेत प्रवेश पूर्णपणे विनाशुल्क राहील.,2. स्पर्धकांसाठी आधार कार्ड बंधनकारक असेल,3. नावनोंदणी स्पर्धेच्या दिवशी ठिकाणीच करण्यात येईल,4. स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यास जबाबदारी स्पर्धकाची राहील,5. ही स्पर्धा फक्त वणी विधानसभा क्षेत्रातील स्पर्धकांसाठी खुली राहील.

या सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे संयोजक लक्ष्मण महादेव उरकुडे.सहसंयोजक सिता नांदेडकर,संपर्क क्षी.गणेश आसुटकर मो.८२०८९८२६३,बालाजी भेदोडकर मो.९७३८३४१६१६,अॅड शुभम छाजेड मो.७७११०७३१११,नितीन बिहारी ८८०५१३८५१३,प्रिति बिडकर मो.९९२३०६०९७, हेमंत गौरकर मो.७४९८१६५५३५, नितीन वासेकर, मो.९०२८०९५९९७, राहुल कुत्तरमारे९७३०२००१५९ , तुकाराम माथनकर ९४२१९८५०६५, विनोद महाकुलकर ९७६३३७१०५४.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments