अजय कंडेवार,Wani : तालुक्यातील राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने याचा फटका येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून महत्वाच्या कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर वाढला आहे.या कर्मचाऱ्यांची कमतरता दिसू नये म्हणुन येथील वैद्यकीय अधिकारी हे “कंत्राटी कर्मचारी” यांना सोबत घेत रुग्णालयाचे कार्य सूरू आहे.असे असून देखील रुग्णालयातून रुग्णाची हेळसांड होतांना गावकऱ्यांना कधीही आढळलें नाही,हे विशेष आहे.
राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत राजूर ईजारा,निंबाळा, चिखलगाव,बोर्डा,नांदेपेरा असे सहा उपकेंद्र व ३४ गावांचा समावेश आहे. त्यात लोकसंख्या ४५,४८७ एव्हढी आहे. या केंद्रांतर्गत राजूर ची लोकसंख्या ९,६६१ व चिखलगावची लोकसंख्या १६,११५ आहे. याबाबतचा या अंतर्गत वेळोवेळी प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या सभा, सर्व्हे रिपोर्टींग, कार्यालयीन रेकार्ड व कुटूंब नियोजन यासारखे विविध कार्यक्रम राबविले जातात. मात्र आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे.कारण असे की,वैद्यकीय अधिकारी उपचार करत असतात माञ रुग्णांना अन्य सेवा देण्याची जबाबदारी कर्मचार्यांवर असते. पायाच डळमळायला लागल्याने रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागते.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून स्थायी आरोग्य सेवक/ सेविका, कंत्राटी आरोग्य सेविका, परिचर, तसेच उपकेंद्रातर्गंत आरोग्य सेविकेचे पद रिक्त आहे. त्यामुळे राजूर प्राथमिक रुग्णालय विशेषतः कंत्राटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन येथील २ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे रुग्णांना वेळी उपचार मिळवून देण्याचा वाटेल ते प्रयत्न करतांना राजूर गावात तसेच दिसत आहे. परिणामी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बरेचदा रुग्ण हीच ईश्वर सेवा हा धर्म पाळताना दिसत आहे. अनेक वर्षापासून कर्मचाऱ्याचा कमतरतेने वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या आजाराचे रुग्ण उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतात. मात्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने बरेचदा रुग्णांना उपचार देतात मात्र पदे रिक्त असल्यानं ताण वाढतानाही दिसुन येतो .तरी जनतेचे हित लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या समस्येकडे जातीने लक्ष देवून रिक्त पदे भरावी, अशी मागणी या परिसरातील जनतेने केली आहे.
•”स्लॅब” कोसळण्याची भीती व अनेक “पदे रिक्त”…..
“राजूर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ,डॉक्टर व कर्मचारी राहण्याचे निवासस्थान नादुरुस्त (dismantle)झाली आहे.ती अतिशय जीर्ण झाल्याने पावसाळ्यात असो की हिवाळ्यात असो “स्लॅब कोसळण्याची” शंभर टक्के भीती आहे. त्यामुळे रुग्णांना व आम्हालाही धोका निर्माण झाला आहे. ही इमारत दुरुस्त करावी जेणेकरून इथे राहता येईल अशी मागणी अनेकदा आमदार व वरिष्ठांना केलेली आहे. तरीही याकडे मागील अनेक वर्षापासून कागदोपत्री पाठलाग सुरुच आहे तसेच आरोग्य रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभागाकडे मागील अनेक वर्षापासून लेखी पत्र पाठविले आहे. मात्र रिक्त पदांची पूर्तता आजगत पूर्तता करण्यात आली नाही” -.डॉ. चिखलीकर, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, राजूर.
•प्रत्यक्ष दृष्टिक्षेपात……
“१.शस्त्रक्रियेनंतर महिलांना ठेवल्या जाणाऱ्या हॉलमध्ये व शस्त्रक्रिया हॉलमध्ये गळती,२.आरोग्य केंद्रात दूरध्वनी नाही,३.डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निवासा इमारतींना घरघर अतिशय बिकट परिस्थीती,४.अंतर्गत झुडपचा विळखा,५.परिसरात घोणससारख्या विषारी सापांचा, विंचुंचा सुळसुळाट,६.कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त, ७.वैद्यकीय अधिकाऱ्यांवर व कर्मचारी यांचावर भार ८.कंत्राटी कर्मचारी घेऊन अधिकारी देताहेत रुग्णांना २४ सेवा.
•ग्रामस्थांची प्रतिक्रया….
” राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी व्यवस्थित गावकऱ्यांना सेवा देत आहे. मनुष्यबळ संख्या कमी असतांनासुद्धा त्यांचे कार्य रुग्णासाठी आजपर्यंत फलदायी ठरले. गावकऱ्यांसबोत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची वागणूक कधीही संशयास्पद नव्हती.“- ग्रामस्थ, राजूर