Monday, September 21, 2026
HomeUncategorizedयुवा ट्रान्सपोर्टर संतोष जुनगरींचा बाबापूर येथील सेवेला मोठा हातभार......

युवा ट्रान्सपोर्टर संतोष जुनगरींचा बाबापूर येथील सेवेला मोठा हातभार……

Wani : नवसाला पावणाऱ्या बाबापूरच्या बाप्पाच्या सेवेसाठी युवा ट्रान्सपोर्टर संतोष जुनगरी यांनी दिलेले सहकार्य यंदाच्या गणेशोत्सवात विशेष चर्चेचा विषय ठरले आहे. लाखो भाविकांच्या सोयीसाठी चार एकर जागेवर पार्किंग उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूमाची आवश्यकता होती. हा मुरूम पोहोचविण्याच्या ट्रान्सपोर्टिंगमध्ये संतोष जुनगरी यांनी मोठा हातभार लावत पार्किंग व्यवस्थेच्या कामाला प्रत्यक्ष बळ दिले.

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पार्किंगची व्यवस्था वेळेत पूर्ण होणे गरजेचे होते. अशावेळी संतोष जुनगरी यांनी ट्रान्सपोर्टिंगच्या माध्यमातून केलेले सहकार्य ही छोटी मदत नसून बाप्पाच्या सेवेला दिलेले मोठे योगदान असल्याची भावना बाबापूर सार्वजनिक गणेश मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या सहकार्याबद्दल मंडळाच्या वतीने विशेष आभारही मानण्यात आले.

अडल्या-नडल्याला धावून जाणारा युवा ट्रान्सपोर्टर….

संतोष जुनगरी यांची ओळख केवळ ट्रान्सपोर्ट व्यवसायापुरती मर्यादित नसून, सामाजिक कामातही ते सातत्याने मदतीचा हात देत असल्याचे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले. छोटी-मोठी मदत असो किंवा अडल्या-नडलेल्या व्यक्तीचे काम असो, संतोष जुनगरी नेहमी सहकार्य करण्यासाठी पुढे असतात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.बाबापूरच्या बाप्पासाठी त्यांनी यंदा दिलेल्या सहकार्यामुळे त्यांच्या या सेवेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘नवसाला पावणारा बाबापूरचा बाप्पा संतोष जुनगरी यांचाही नवस पावो,’ अशी सदिच्छा बाबापूरवासीयांकडून व्यक्त होत असून, बाप्पाच्या सेवेत त्यांच्या योगदानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page