Ajay Kandewar,Wani:- महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचार सुरु झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेही संजय देरकर यांच्या प्रचारासाठी कंबर कसून उतरले आहेत. वणी व मारेगाव नंतर झरी तालुक्यात संजय देरकर यांच्या प्रचार कार्यालयांचे जल्लोषात उदघाटन करण्यात आले.यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते मंडळी ,शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचेही पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मविआचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांचा तिन्ही तालुक्यांत प्रचार जोमात सूरू आहे. त्यांना प्रत्येक गावात जनतेकडून उत्सूर्फ प्रतिसाद ही मिळत आहे. त्यात भर म्हणजे काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी यांच बळ मिळाल्याने त्यांना विजयी मार्ग सुकर झाल्याचे सध्याचे चित्र दिसुन येतं आहे.गेल्या 10 वर्षापासून वणी मतदारसंघांमधील जनता अनेक समस्यांनी ग्रस्त आहे आणि येथील असलेले आमदार सपशेल अपयशी ठरलेले आहेत जे प्रश्न जनप्रतिनिधींनी सोडवायचे असतात त्या प्रश्नासाठी संजय देरकर स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचाच मान म्हणून यंदा मान म्हणून जनतेने संजय देरकर यांना आमदार बनविण्याचे ठरविले असे स्पष्ट चित्र दिसत आहे.