अजय कंडेवार,Wani:– ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ अंतर्गत चालणाऱ्या सम्यक प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत मोहदा व महाकालपुर येथे दि.18 डिसें रोजी पथनाट्यच्या माध्यमातून जागर करण्यात आला.
ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ अंतर्गत चालणाऱ्या सम्यक प्रकल्पाचा माध्यमातुन ग्रामपंचायत विकास आराखडा,संविधान प्रस्ताविका व हागणदारीमुक्त गाव या विविध विषयावर पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी अनेकांनी मते माडले.यावेळी ग्रामपंचायत मोहदा येथील सरपंच वर्षा राजूरकर यांनी पथनाट्यच्या माध्यमातून गाव विकास कसा करता येईल यावर मत व्यक्त केले व समस्या मुक्ती ट्रस्टचे आभार मानले.या कार्यक्रमाला महाकालपुर सरपंच नीलिमा बोंडे व उपसरपंच गजानन खिरडकर ( पंचायत मित्र ) प्रशांत रासेकर (मोहदा) ,अनुप देठे (महाकालपूर ),श्रुपेश हिवरकर GSMT सहायक क्लस्टर ,ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ येथील टीम व ग्रामस्थ उपस्थित होते.
•शाश्वत विकासात लोकसहभाग आवश्यक-
” ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या निधीचे सुयोग्य नियोजन करता येईल. ग्रामपंचायतीमधील विकास प्रक्रिया एकात्मिक व सर्वसमावेशक होईल. गावातील नागरिकांचा आणि गावचा शाश्वत विकास होईल. लोकसहभागातून मर्यादित संसाधनाद्वारे आपल्या ग्रामपंचायतमधील समस्या सोडविता येतील. गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयातून विकास करणे साध्य होईल – मोहदा उपसरपंच सचिन रासेकर .