Tuesday, July 15, 2025
Homeवणीमाकप व किसान सभेचे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निदर्शने

माकप व किसान सभेचे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निदर्शने

अजय कंडेवार,वणी : केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळें एकीकडे शेतकरी पुरता हवालदिल झाला असताना यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अस्मानी संकटाने पूर्णपणे आर्थिक डबघाईस आणले आहे. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने होते नव्हते ते ही हिसकावून घेतले. अश्या परिस्थितीत शेतकरी सापडला असताना मात्र राज्य सरकार दुष्काळ जाहीर न करता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळी झाली आहे. ह्याचाच निषेध करीत पुन्हा एकदा अखिल भारतीय किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष दि. 25 जाने. ला वणी तहसील कार्यालय समोर निदर्शने आंदोलन करीत राज्य व केंद्र सरकारला इशारा देणार आहे.

ह्या आंदोलनात शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्या घेऊन आंदोलन होत असल्याने ह्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन माकप व किसान सभेच्या वतीने कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. ऍड. दिलीप परचाके यांनी केले आहे.

यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50 हजार आर्थिक मदत द्यावी ही मागणी घेऊन किसान सभा सातत्याने आंदोलन करीत आहे. ओला दुष्काळ मुळे आणि केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला असून शेतकरी, शेतमजुरांच्या आत्महत्येत वाढ झालेली आहे. यासाठी संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी.

पीक विमा ताबडतोब देण्यात यावा, शेतमालाला दीड पट भाव देण्यात यावा, गायरान व देवस्थान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा, शेतकरी विरोधी केंद्रीय वीज विधेयक वापस घ्या, वनाधिकार कायद्याच्या सुधारित नियम 2012 नुसार वनहक्क प्रदान करा आदी मागण्या ह्या निदर्शने आंदोलनात करण्यात येत आहेत, करिता जास्तीतजास्त शेतकरी, शेतमजुरांनी ह्या आंदोलनात सहभागी होऊन आपले अधिकार मिळवून घ्यावे असे आवाहन शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, ऍड. दिलीप परचाके, चंद्रशेखर सिडाम, रामभाऊ जीड्डेवार, कवडू चांदेकर, सुधाकर सोनटक्के, गजानन ताकसांडे, आदींनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments