•फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात अनेकांचे पक्ष प्रवेश.
अजय कंडेवार,वणी: मनसे आपली ताकद वाढवायला लागली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने विदर्भातील मनसे नेते पक्षातील इनकमिंगवर जास्त भर देत आहे. याचाच एक भाग म्हणून बेसा येथील ग्रामपंचायत सदस्यासहित बेसा गावातील गावकऱ्यांनी मोठ्ाप्रमाणात पक्ष प्रवेश घेतला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बोलबाला असलेल्या वणी विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जोरदार इन्कमिंग पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम अतिशय झपाट्याने चालू आहेत वणी विधानसभेत पूर परिस्थिती निर्माण झाली .त्यावेळी सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना च पूर्वी त्यासाठी धावून गेली त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकऱ्यांकरिता दत्तक योजना ही चालू करण्यात आली. या सर्व कामाचा झपाट चालू असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बेसा येथील असंख्य युवक व गावकऱ्यांनी प्रवेश केला .
“विशेष म्हणजे मनसेने वणी, मारेगाव तालुक्यात पक्षप्रवेश मेळावेच घेतले आहे. यात आतापर्यंत विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची माहिती आहे. तसेच आणखी अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मनसेत प्रवेश करण्यास इच्छूकही आहेत, अशीही खमंग चर्चा देखील आहे”
गावातली दुर्वास हेपट ,राजू हेपट ,विठ्ठल धावरी ,शरद आस्वले, सचिन उपरे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप हेपट ,ईश्वर खोके ,पियुष हेपट प्रवीण बल्की ,राम धोंगडे, सदानंद आस्वले, भारत धोंगडे ,पुंडलिक खोके, महेश देवतळे ,उमाकांत गहूकर, विष्णू देवतळे ,सचिन धोंगडे ,दीपक निमकर ,धर्मवीर टेकाम ,प्रवीण निमकर ,सागर पोटे ,सचिन अस्वले
,सचिन उपरे ,विशाल गोहकर, अतुल जुनगरी ,निलेश फटाले, राधेश्याम हेपट, अरुण अस्वले दिनेश अस्वले यांच्या सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहकार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी पक्षाचे विलन बोदाडकर ,अरविंद राजुरकर ,मिथुन धोटे, गौरव पुराणकर ,अमोल जेऊरकर उपस्थित होते