Ajay Kandewar,Wani Assembly pole :- विधानसभेच्या रणधुमाळीत अनेक राजकीय उलथापालत होत आहे. यातच मनसेने भाजपला धक्का देऊन अनेक पदाधिकाऱ्यांना आपल्या तंबूत सहभागी करून घेतले. मनसेने हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्याने अनेकांनी मनसेकडे आपला मोर्चा वळविला आहे. मनसेचे तालुका उपाध्यक्ष राकेश शंकावार आणि विभाग अध्यक्ष कैलास निखाडे यांच्या नेतृत्त्वात मनसेचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वणीतील पक्ष कार्यालयात भाजपा पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. यात शंकर डाहुले (भाजपा बूथ प्रमुख) वडाजापुर, बेरू टेकाम, हिराजी पाटील डोहे, प्रतिक सातपुते, सोमेश टेकाम, पांडुरंग उइके, मारोती बोरीकर, अतुल हागे, धनराज बोरकर यांचा सामावेश आहे.
मनसे नेते तथा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार राजू उंबरकर यांनी आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले. व राज ठाकरे यांचे विचार तळागाळात पोहचवून येत्या निवडणुकीत मनसेला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या..