Ajay Kandewar,Wani:- वणी नगरपरिषद निवडणुकीची तापती रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक ६ मध्ये “पाते” कुटुंबाच्या बाजूने जनतेचा स्पष्ट झुकाव दिसू लागला आहे. समाजकार्यात अग्रेसर असणारे हरीश पाते यांच्या कार्याचा ठसा एकदा मतदारांच्या मनात दृढ होत असल्याचे चित्र आहे.यंदाच्या निवडणुकीत हरीश अर्धांगिनी “धम्मदिन पाते” मैदानात उतरल्याने प्रचाराला अनपेक्षित वेग प्राप्त झाला आहे. घराघरांतून एकच आवाज उमटू लागला आहे :“ताई… तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं!”
प्रभाग ६ मधील नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की, “गेल्या काळात हरीशभाऊ यांनी दिलेला आधार, तत्पर सेवा आणि सर्वांसाठी सदैव उपलब्ध असलेली त्यांची उभी साथ विसरता येणारी नाही. म्हणूनच यंदाही आम्हाला ‘पाते’च पाहिजे!”धम्मदिन “यांच्या सभ्य, समंजस आणि सर्वसमावेशक प्रतिमेमुळेच जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाते कुटुंबाच्या उपस्थितीने प्रभाग ६ मधील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे.प्रचाराचा जोम, वाढता जनसमर्थन आणि जनतेची ठाम मागणी यंदाही प्रभाग ६ म्हणतो आहे… “पाते” पाहिजे”

