Ajay Kandewar,Wani – नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक १० मध्ये राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. राजू साठे यांच्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार जनसंपर्कामुळे प्रभागात त्यांच्या अर्धांगिनी मीनाक्षी साठे यांची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत आहे.
स्थानिक पातळीवर घराघरांत होणाऱ्या चर्चांमध्ये, चौकाचौकात सुरू असलेल्या संवादांत “प्रभाग १० मध्ये मीनाक्षी ताई पहिल्या क्रमांकावर” असल्याचं मतदार सर्रासपणे बोलत आहेत. जनसामान्यांशी साधणारा थेट संवाद, प्रभागातील समस्यांची नेमकी जाण आणि लोकांमध्ये असलेला विश्वास या तिन्ही गोष्टींमुळे मीनाक्षी ताईंनी आपलं मजबूत वर्चस्व निर्माण केल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे.शहरातील महिलांपासून ते युवावर्गापर्यंत सर्वच स्तरांत साठे दांपत्यावरील विश्वास अधिक दृढ होताना दिसत आहे. राजूभाऊंच्या जुन्या कार्यकर्तृत्वाचा आणि लोकांशी असलेल्या जवळिकीचा थेट फायदा मीनाक्षीताईंना मिळत असल्याचं राजकीय जाणकारांचेही मत आहे.
•मतदारांची एकमुखी भूमिका : “यंदा बदलच पाहिजे… मीनाक्षीताई चाच विजय पाहिजें!”
संपूर्ण प्रभागात ‘विकास, संपर्क आणि विश्वास’ या त्रिसूत्रीवर आधारित प्रचार राबवला जात असून, त्याला मिळणारा प्रतिसाद कमालीचा उत्साहवर्धक आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे मतदार स्पष्टपणे व्यक्त करत आहेत.या सर्व घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक १० मध्ये मीनाक्षी ताई यांची विजयी घोडदौड अधिकच वेगवान झाली असून, विरोधकांमध्ये स्पष्टपणे खळबळ उडाल्याचे चित्र दिसत आहे.प्रभाग १० मध्ये ‘मीनाक्षी ताईंचं वर्चस्व’ अधिक दृढ झाल्याने निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे!

