•धुलीचंदचा मृत्यूनंतरही सामाजिक दायित्वाचा ठसा उमटवून गेले.
अजय कंडेवार, वणी:- सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहिलेले धुलीचंद चिरंजीलाल पोद्दार यांचे वृद्धापकाळाने 6 मार्च 2023 दुःखद निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांचे ते वडील असुन 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली असता ही बातमी कळताच त्या परिवाराचे निकटवर्ती मानलें जाणारे विजय चोरडिया यांनी पोद्दार कुटुंबीयांना सांत्वना देण्यास पोहोचले.
वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार पार पडला. सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांचे वडिल पश्चात तीन मुले, नातवंडे असा आप्त परिवार आहे. वडिलांचा मृत्यूनंतर सामाजिक दायित्वाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न(The Poddar family took “this” vow.) पोद्दार कुटुंबीयांकडून झाला. पोद्दार कुटुंबियांकडून मोक्षधाम समितीला वडिलाचा स्मुर्तीप्रित्यर्थ 51,000 हजार रोख रक्कम भेट दिली. विशेष पोद्दार कुटुंबीयांकडून एक प्रण ही करण्यात आले की, आर्थिक दुर्बल कुटुंबीयांना (गरजूंना) अंत्यसंस्कार विधी साठी लागणारा खर्च 7100/- रूपये मदत म्हणून दिली जाणार असल्याचे जाहिर केले. मृत्यूनंतर नावरूपाने जिवंत ठेवण्याचे काम या आदर्श कुटुंबाने केले. हे सर्वात मोठे पाऊल असुन स्व. धुलीचंद पोद्दार यांचा मृत्यूनंतरही सामाजिक दायित्वाचा ठसा उमटवून गेला.The Poddar family took “this” vow.
“धुलीचंद यांचे जीवन जगण्याची कला अतिशय साध्या पद्धतीची होती. मुलांनीही तिच परंपरा सुरू ठेवली. आणि आज पोद्दार कुटुंबियांचे नाव संपुर्ण शहरात आहे. एक आठवण म्हणून मोक्षधाम समितीला या कुटुंबीयांनी 51 हजार रोख भेट स्वरूपात दिले .विशेषत म्हणजे पोद्दार कुटुंबीयांनी एक प्रण घेतला तो म्हणजे आर्थिक दुर्बल भागातील लोकांना सदगतीसाठी पुरेसा पैसा नसतो त्यांना 7100/- रूपये मदत म्हणून देण्याचे प्रण हे स्तुतियोग्यच आहे. “ – तुगनायक महाराज,वणी