Thursday, March 5, 2026
HomeBreaking“पैसा आप लगाओ साहेब" ‘मीच खरा उमेदवार’......

“पैसा आप लगाओ साहेब” ‘मीच खरा उमेदवार’……

Ajay Kandewar, Wani:- वणी तालुक्यात निवडणुकीचा माहोल रंगात आला असून “मीच उमेदवार” अशी स्वयंघोषणा करणाऱ्यांची लगबग चांगलीच वाढली आहे.पैसा आप लगाओ साहेब…मैं खडा रहता…असा आत्मविश्वासपूर्ण घोषवाक्य फेकत काही जण राजकारणाच्या मैदानात आपली उपस्थिती जाणवून देत आहे.

सत्तेच्या खुर्चीवर बसण्याची ओढ आणि प्रसिद्धीचा मोह या दोन्हींच्या संगमात काही इच्छुकांनी आपली उमेदवारी जाहीर करून राजकीय ‘स्टंट’ उभारला आहे. पक्षाकडून हिरवा कंदील मिळो किंवा न मिळो, प्रचार मात्र जोमात सुरू आहे.लोकप्रियता मिळवण्यासाठी आधी आवाज मोठा करा, बाकी तिकीट नंतर मिळेल,अशीच त्यांची रणनीती दिसते.वणी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आता उमेदवारांची रांगच लागली आहे. प्रत्येक गल्ली, चौकात बॅनर, पोस्टर आणि सोशल मीडियावर प्रचाराचे वादळ उठले आहे. काहींनी स्वतःच उमेदवार बनून ‘मीच योग्य’ असा गजर सुरू केला आहे.

स्थानिक पक्षप्रमुखांनाही आता कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणाला आवर घालावा हेच कोडं बनलं आहे. काहींनी पैशाचा, काहींनी जनसंपर्काचा आणि काहींनी केवळ धडाडीचा आधार घेत आपली उमेदवारी ठोकली आहे.ही स्वयंघोषणांची स्पर्धा म्हणजे आकर्षकतेचा खेळ आहे .जिथे निष्ठेपेक्षा नाट्यमयता,आणि कार्यापेक्षा प्रसिद्धी महत्त्वाची ठरत आहे.एकंदरीत, वणीच्या राजकारणात सध्या नवे कलाकार ‘ऑडिशन’ देत आहेत, आणि जनता मात्र हा तमाशा पाहत विचार करतेय खरोखर कोण उमेदवार आणि कोण फक्त कलाकार….

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page