Ajay Kandewar,Wani:- वणी तालुक्यातील वांजरी येथे आज दुपारी 2 च्या दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली. महेश रामभाऊ उज्वलकर (वय अंदाजे 20 वर्षे) या तरुण शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून, घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
महेश हा परिश्रमी आणि सर्वांशी मनमिळावू स्वभावाचा होता. बारावी नापास झाल्यानंतर त्यांनी शेतीची पूर्ण काम आपल्या हाती घेत संसाराचा गाडा हाकण्याचा प्रयत्न सुरू केला होता. पण अवघ्या दुपारच्या वेळेस असं काय घडलं की, अचानक त्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन जीवन संपवल. त्याच्या मृत्यूचा पश्चात आई-वडील, लहान भाऊ आणि एक बहीण असा आप्तपरिवार आहे. कुटुंबाच्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव हळहळले असून, प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून तपास सुरू केला आहे. वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहे अशी माहिती बातमी लिहितोस्तव मिळाली .शेतकऱ्यांच्या जगण्याच्या संघर्षात आणखी एक उमेद हरपली समाजमनाला हादरा देणारी ही घटना ठरली आहे.

