Ajay Kandewar,Wani:- येथील ललित लांजेवार यांचे 29 जानेवारीला धक्कादायक निधन झाले. मात्र, त्याच्या मृत्यूला जबाबदार वणी पोलिस स्टेशनचे काहीं कर्मचारी असल्याचा आरोप मृतकाचा पत्नीने व शिवसेना शिंदे गट यांचे वतीने करण्यात आला होता आणि शेवटीं यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत यवतमाळ पोलीस अधीक्षक यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले असता, थेट त्या तिघांचा बदलीचे आदेश वणी पोलीस ठाण्यात धडकताच ” त्या ” तिन्ही वणी पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली.
•काय आहे प्रकरण वाचा….
सविस्तर वृत्त असे की,’पोलीस स्टेशनचा हवालदार बनला रेती माफिया’ या शिर्षकाखाली एका वृत्तपत्रात आलेली बातमी ललित लांजेवार यांनी एका सोशल मीडियाच्या गृपवर व्हायरल केली होती. ही बातमी विकास धडसे, शुभम सोनुले व सागर सिडाम या तिघांच्या फोटोंसह प्रकाशित झाली होती. ती पेपर कटिंग मृतक ललित लांजेवार यांनी व्हायरल केल्याने ते “तिन्ही” पोलीस कर्मचारी ललितवर प्रचंड चिडले होते. त्यानंतर विकास धडसे यांनी ललितला तर अॅट्रॉसिटीच्या गुन्हात तुला अडकवितो म्हणून धमकी दिली. त्या धमकीने ललित प्रचंड तणावात होता. त्यानंतर मृतक ललितने त्या तीन पोलिस कर्मचारी यांचा विरोधात 26 जानेवारीला जे पोलीस पोलीस खात्यात राहून रेती तस्करी करीत असल्यान पोलीस खातं बदनाम होत असल्यानं त्यांचावर कारवाई व्हायला पाहिजे व त्या तिघांना पोलीस खात्यातून निलंबित करावे अश्या आशयाचे पत्र पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे दिलें होतें परंतु काही समजायच्या आतच ललित यांचा हृदयिकाराच्या धक्क्याने 29 जानेवारी रोजी मृत्यू झाला.
याबाबत मृतकाचा पत्नीने थेट वणी पोलिस स्टेशन गाठत विकास धडसे मुळेच माझा पतीचा जीव गेला याबाबतची लेखी तक्रार दिली. तसेच शिवसेना शिंदे गट यांचे वतीने सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर यांनी वणी ठाणेदार यांना निवेदन देत शिंदे गटातर्फे पत्रकार परिषदेत घेण्यात आले.जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी या विषयाची दखल घेत यवतमाळ पोलिस अधीक्षक यांच्याकडून प्रकरणाची माहिती घेतली व चौकशीचे आदेश दिले त्यावरून पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी थेट बदलीचा आदेशच वणी ठाण्यात पाठविला त्यात “त्या”पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली. त्यात विकास धडसे ,शुभम सोनुले, सागर सिडाम यांची दारव्हा व दिग्रस या विभागात पाठविण्यात आलें. तर पुढील चौकशी स्वतः पोलीस अधीक्षक जातीने लक्ष देऊन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
•जनतेच विश्र्वास “खाकी ” वरून कमी , बीट जमादार व त्यांचें रायटर बनू लागले साहेब….
“या बदलीने वणी पोलिस ठाण्यात वातावरण बदलल्याचे दिसून येतं आहे. यामुळें चालत असलेल्या प्रकरणाला पाहून सामान्य जनतेच विश्र्वास “खाकी “वरून उडत असल्यान चिंतेचा विषय बनला आहे.”आतातरी नविन ठाणेदाराने बीट जमादार ज्या पद्धतीचा तोऱ्यात राहत खमकुन वसुली करीत आहे त्यांना आवर घालने गरजेचे आहे कारण त्यांचा गैरसमज असा की, ये मेरा गाव हैं.. यहा का मैं राजा…”अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच त्यांचे रायटर ला हफ्ता मिळालं नाहीतर त्यांचा रुबाब अधिकारी यांचापेक्षा भारी असल्याचं सध्याच चित्रं वणी पोलिस स्टेशन अंतर्गत दिसून येतं आहे. याकडे ही अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.”