Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsपहिल्याच भाषणात वणी मतदासंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले....!

पहिल्याच भाषणात वणी मतदासंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले….!

•तीन प्रश्नांनी विधिमंडळात आ.संजय देरकर यांनी छाप सोडली.

Ajay Kandewar, वणी :- येथील विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी नागपूर येथे चालू आलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या भाषणात मतदार संघातील जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रलंबित असलेल्या प्रश्नांना सरकार दरबारी मांडून वाचा फोडल्याने आमदार देरकर यांनी तमाम मतदारांची मने जिंकलें.

नुकतीच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या असून जेमतेम सरकार स्थापन होऊन पहिलेच अधिवेशन नागपूर येथे संपन्न होत आहे. या पहिल्या अधिवेशनात आज तारीख १८ रोजी राज्याचे महामहीम राज्यपाल यांच्या अधिसूचनेत वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांना बोलण्याची संधी मिळाली असता त्यांनी वणी , मारेगाव ल, झरि तालुक्यातील जलजिवण योजनेअंतर्गत अत्यंत संथ गतीने चालू असलेल्या कामाबाबत कामांना गती देण्यासाठी सरकारने निधी देवून २४१ गावातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, तसेच वणी तालुक्यातील शिंदोला परिसरातील देवस्थानाची जमीन शेतकरी कसत असून ७/१२ वर त्या शेतकर्यांनी नावे नाही त्यामुळे त्यांनी पिकविलेला कापूस सीसीआय खरेदी करून घेत नाही. त्यांचा कापूस सीसीआयने खरेदी करण्यासाठी तहसीलदार यांचे पत्र असूनही खरेदी केल्या जात नसल्याने सरकारने त्यांना कापूस खरेदीचे आदेश द्यावे व सीसीआय खरेदीचे केंद्र वाढविण्यात यावे,

तसेच शिरपूर – कोरपणा मार्ग हा पुर्णतः खड्डेमय झाला आहे. तो मार्ग अवघ्या दोन वर्षात उद्ध्वस्त झाला आहे तो तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी आमदार देरकर यांनी केल्याने हे तिन्ही प्रश्न अत्यंत जनतेच्या जिव्हाळ्याचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments