•आता वरिष्ठांकडे धाव का ?
अजय कंडेवार,वणी :- शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण करून भोगवटदार नोंदी केल्याप्रकरणी वणी तालुक्यातील मोहदा येथील उपसरपंच सचिन ज्ञानेश्वर रासेकर यांना अपात्र करण्यात आले. उपसरपंच सचिन रासेकर यांच्या आईच्या नावाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार माजी सरपंच गौतम अमरसिंग सुराणा यांनी केली होती. अपर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी अपात्रतेसंबंधी आदेश 24 नोव्हे. रोजीज पारित केले.
तसेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घराचे बांधकाम करीत शासनाची दिशाभूल करणे हे कायर सरपंच नागोराव मारोती घनकसार याला अंगलट आले आहे. याप्रकरणी सदस्य व सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरविणार कागदोपत्री आदेशाने रट्टा देण्यात आला.
सब अप्पर जिल्हाधिकारी पत्र जिल्हाधिकारी यांनी केलेल्या अधिकारानुसार हा अपात्रतेचा आदेश पारित करित करण्यात आले.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५१ चे कलम (१४)(ज-३,) नुसार दाखल केलेला “विवाद अर्ज” मंजूर करण्यात आले.त्यात नागोराव मारोती घनकसार कायर ग्रामपंचायत सरपंच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ व(ज-३) अनुसार मधील तरतुदीनुसार सदस्य व सरपंच ग्रामपंचायतमधून अपात्र घोषीत करण्यात आले.सदरचा या दोन्हीं प्रकरणात यवतमाळ येथील नामांकित ॲडव्होकेट पी.एम्.अडकिने यांनी हा युक्तिवाद केला असुन शेवटीं सदर प्रकरण निकाली लावण्यात यश आलें.