•फसवणूक झालेल्यांनी पोलिसांना रीतसर तक्रार करा असे आवाहन
अजय कंडेवार,वणी:- ऑनलाईन गंडा, एनी डेस्क एप्लिकेशन्सचा सायबर घटनेत वाढ,सेक्सटॉर्शनच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.अनेकजण यामध्ये बळी पडले आहे. विशेषतः समाज माध्यमावर अनोळखी व्यक्तीची आलेली रिक्वेस्ट स्वीकारून आधी बोलणे अन् नंतर व्हिडिओ कॉल करणे अन् तो केलेला व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या अकाउंटवर टाकण्याची धमकी देत बदनामी करण्याचा ट्रेंड, online गंडा घालण, कोणत्याही लिंक ला ओपन करुन स्वतःच account रिकामे करुन घेणे अशे अनेक गुन्हे मागील काही दिवसांपासून बळावत आहे. अशाच प्रकारचे any desk application संदर्भात गुन्हे दाखल झाले आहे. आपण फसवणुकीचे अनेक प्रकार पाहिले आहे.
परंतु अत्याधुनिक काळामध्ये प्रत्येकाच्या घरी अँड्रॉइड मोबाइल असून याचाच फायदा फसवणुक करनारे पुरुष असो वा महिलांची नजर ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांवर असल्याचे दिसते. परिसरातील युवक व युवतींना व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून आधी चॅट मग अश्लील व्हिडीओ कॉल अन् नंतर ब्लॅकमेलिंग सेक्सटॉर्शन म्हणजेच खंडणी वसूल करण्यासंदर्भात अनेक प्रकरण तुम्ही ऐकली असतील. मात्र आता सेक्सटॉर्शन हे नवीन प्रकार डोकेदुखी वाढवणारे ठरत आहे.व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फसवणूक करुन ते व्हिडीओ कॉल सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पोलिसांच्या सायबर सेलमध्ये अशा ऑनलाईन गंडा संदर्भातल्या तक्रारी येत आहे. फसवणूक झालेले बहुतांशी लोक पोलिसांना रीतसर तक्रार न करताच मदतीसाठी याचना करत आहे. फसवणूक करण्याकरता तरुणांचा खुबीने वापर केला जातोय. सुरुवातीला सोशल मीडियावर येणाऱ्या प्रायव्हेट मेसेजद्वारे तुमचा मोबाईल नंबर मागितला जातो,आणि नंतर सुरु होते चॅटिंगची मालिका.
चॅटिंग करताना हे तरुण,तरुणी केव्हा जवळीक गाठतात हे समोरच्याला कळत सुद्धा नाही. दरम्यान हळूहळू अश्लील बोलत व्हिडीओ कॉल करायला भाग पाडतात. करतात,आणि मग ठरलेल्या वेळी व्हिडीओ कॉल केला जातो. तो व्हिडीओ कॉल संपताच धमकीचे मेसेज येऊन व्हिडीओ कॉलवरील रेकॉर्ड केलेले अश्लील चाळे व्हायरल करण्याची धमकी देत हजारो, लाखो रूपये उकळले जातात. अशी जोरदार चर्चा देखील गावातील परिसरात होत आहे . त्यामूळे अश्या काही घटना झाल्यास तरुणांनो निडर पोलिसांशी संपर्क साधावे.
आणखी….!!!!!! सावधानता यामध्येही घ्यावी:-
1.नेहमी Amazon, Flipkart, Shop Clues, Pepperfry आणि इतर लोकप्रिय वेबसाइटवरूनच ऑनलाइन शॉपिंग करा. अँटी-व्हायरस फायरवॉल अपडेटेड असणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीकडून कधीही अज्ञात वेबसाइट किंवा अॅप डाउनलोड करू नका.
2.मेसेजमध्ये असलेल्या लिंक्सबाबतही काळजी घ्या. अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळा. तुमच्या खात्याचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहा. तुमचा बँक डेटा कोणाशीही शेअर करणे टाळा.
3.एखाद्या व्यक्तीने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला की फसवणूक करणारे त्याला बोलण्यात गुंतवतात. तसंच थकित वीजबिल पडताळण्याच्या बहाण्याने ते ग्राहकांना बँक खात्याचे डिटेल शेअर करण्यास सांगतात. याशिवाय, ते AnyDesk, Team Viewer सारखे रिमोट अॅक्सेस अॅप्लिकेशन्स (Remote Access Application) इन्स्टॉल करायला लावण्याचा प्रयत्न करतात.
अश्या काही घटना झाल्यास तरुणांनो निडर पोलिसांशी संपर्क नक्कीच साधावे…… :-
” सेक्स स्टॉर्सनची प्रकरणे अनेक घडत असून ते बदनामी पोटी समोर देखील येत नाही आहे. शेवटी टोकाचे पाऊल उचलण्याची तयारी दर्शविली जाते विशेष तरूणांना टार्गेट केले जात आहे. असे जरी असले तरी पीडित हा आपल्या बदनामीपोटी तक्रार दाखल करण्यास धजत नाही. तेंव्हा अनोळखी व्यक्तीकडून आलेली रिक्वेस्ट स्विकारू नये. अनोळखी व्यक्ती सोबत अशा कृत्यात सहभागी होऊ नये ” – गजानन करेवाड, (ठाणेदार, शिरपूर)