•शहरात धारदार शस्त्र वापरणाऱ्यांचा संख्येत वाढ.
अजय कंडेवार,वणी :-धारदार शस्त्र अवैधरित्या बाळगणा-या एका युवकाला वणी पोलिसांचा चमूने अटक केली आहे.आरोपींचे नाव संजय उर्फ शेंगदाण्या सिताराम वाघटकर (वय ३७ वर्ष) रा. गोकुळनगर, वणी येथील आहे.पथकाने त्याच्याकडून धारदार शस्त्र (1 तलवार) जप्त केली आहे.
वणी येथील गोकुळनगर येथील विनर्स बार समोर एक इसम धारदार शस्त्र (तलवार) बाळगत चौकात माज माजवित असल्याची मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिस पथकाने दि.25 सप्टें.सोमवार रोजी, त्याठिकाणी जाऊन आरोपीला शिताफीने अटक केली. तो पोलीसांचे अटक चुकविण्याचा प्रयत्न करीत असल्याने सौम्य बळाचा वापर करून स्टाफच्या मदतीने त्यास ताब्यात घेतले.पोलिसांनी आरोपीकडून 1 धारदार तलवार जप्त करण्यात आली व पोलिसांनी खाकी दाखविताच कुणाकडून घेतली त्याबद्दलही माहिती घेणे सुरू आहे.
या युवकावर कलम 4/25 शस्त्र कायदा सहकलम महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार 506 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही गणेश किन्द्रे (उप.वि.पो.अ.वणी) यांचे मार्गर्शनात ठाणेदार P.I अजित जाधव यांचा आदेशावरून वणी पोलिस धडसे, शुभम सोनुले,सागर सिडाम व मो.नसीम यांनी केली आहे.