•L.C.B ची कारवाई…
अजय कंडेवार,वणी:- अवैधरित्या घातकशस्त्र बाळगणा-या एका युवकास स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने अटक केली आहे. आरोपींचे नाव रोहीत राहुल संजय डबडे (वय २१ वर्षे, रा. इंदीरा चौक,आसाम मंजीलजवळ) वणी येथील आहे. पथकाने त्याच्याकडून धारदार शस्त्र (1 तलवार) जप्त केली आहे.Arrested for carrying a sharp weapon…!•The action of L.C.B.
वणी येथील S.P.M शाळेमागील खुल्या मैदानात एक युवक हातात लाल रंगाचे कापडात धारदार शस्त्र (तलवार) अवैधरित्या घातकशस्त्र बाळगत असल्याची माहिती L.C.B चमूला मिळाली होती. ही माहिती मिळताच पथकाने दि.27 मे सकाळीं 11.30 वाजताचा सुमारास दरम्यान त्याठिकाणी जाऊन आरोपीला शिताफीने अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून 1 धारदार तलवार जप्त करण्यात आला व पोलिसांनी खाकी दाखविताच कुणाकडून घेतली त्याबद्दलही माहिती दिली.
या युवकांवर कलम 4/25 शस्त्र कायदा सहकलम महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई वरिष्ट अधिकारी डॉ. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, प्रदिप परदेशी पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पोउपनि योगेश रंधे, योगेश डगवार, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, सतिश फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.