Wani:- येथील एका हॉटेलात बिर्याणीमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून रविवारी संध्याकाळी ५ वाजता शहरातील मोमिनपुरा परिसरात दोन गटात शाब्दिक बाचाबाची आणि हाणामारी झाली. या घटनेबाबत परस्पर विरोधी फिर्याद देत वणी पोलिस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आलें.
मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली की, मोमिनपुरा येथील हॉटेलमध्ये गोमांस मिसळलेली बिर्याणी विकली जात आहे. अश्या बाबतचे संशयावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमधून बिर्याणीची प्लेट मागवण्यासाठी एकाला पाठवले. त्या बिर्याणीमध्ये गोमांस असल्याचा संशय आल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वणी पोलिसांना माहिती दिली. माहितीच्या आधारे, एक पोलिसाचा ताफा मोमीनपुरा येथील हॉटेलमध्ये पोहोचला. त्याचवेळी बजरंग दलाचे काही कार्यकर्तेही तिथे पोहोचले. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. यामुळे दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली आणि हाणामारी झाली. बजरंग दलाचे कार्यकर्ते संतोष तुलसीदास लक्षेट्टीवार यांच्या तक्रारीवरून, वणी पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या पक्षातील अनिस खान अझीज खान (४८, रा. मोमिनपुरा) यांच्या तक्रारीवरून, ५ जणांविरुद्ध भादंविच्या कलम कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दोन्ही घटनांचा पुढील तपास वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर करीत आहेत.
•”तर होणार कठोर कारवाई……
दिलेल्या माहितीचा आधारे बिर्याणी हॉटेलमधून जप्त केलेले मास चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले . जर तपास अहवालात गोमांस आढळून आले तर हॉटेल मालकावर कठोर कारवाई केली जाईल- वणी पोलीस स्टेशन ठाणेदार P.I गोपाल उंबरकर