Ajay Kandewar,Wani:- राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ज्या मुख्यमंत्री पदाची प्रतिक्षा लागून राहिली होती. ती आता पूर्ण झाली असून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याचसोबत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष करून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे दुसरे उपमुख्यमंत्री झाले आहेत.
२०२२ साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर राज्याच्या इतिहासात उपमुख्यमंत्री पद सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत. तर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. यात विशेष म्हणजे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री बनण्याचा नवा रेकार्ड बनवला आहे.
●मुंबई येथील शपथविधीचा जल्लोष वणीत…..
•फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर
या अभूतपूर्व सोहळ्याचे थेट प्रक्षेपण येथील टिळक चौकात करण्यात आले. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत भाजपचे व युतिचे पदाधिकारी विनोद मोहितकर, विजय पिदुरकर,दिनकर पावडे,रवि बेलुरकर, आशिष मोहीतकर,संजय पिंपळशेंडे, नितिन वासेकर,गजानन विधाते, राकेश बुग्गेवार,संतोष डंभारे,ललित लांजेवार,व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तर ढोलताशांचा गजर करत मोठ्या उत्साहात जल्लोष केला.