•ठाण्यात कारभार चालतोय अपुऱ्या मनुष्यबळावर.
•डीबी के ‘दो- दो टीम ‘…. ‘दम मारे दम ‘ क्या करे हम अशी स्थिती.
अजय कंडेवार,वणी:-गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरटे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. त्यामुळे दुचाकी चोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत.दररोज एक दोन दुचाकी वाहने चोरीला जात असून याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारी येत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलिस विभागाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
अश्या वाढत्या घटनेने परिणामी पोलिस यंत्रणेवरचा ताण वाढत आहे. तर दुसरीकडे लोकसंख्या वाढ, वाढती गुन्हेगारी, गुन्ह्यांचे विविध प्रकार, सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे आदी प्रकार वाढले आहेत. पोलिस ठाण्यात गुन्हे शोध पथक (डीबी) असते. त्यासाठीही पोलिस अधिकारी व कर्मचारी नियुक्त असतात. त्यांच्याकडे खबऱ्यामार्फत बरीच माहिती मिळू शकते. त्यामुळे त्या त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी गेलेल्या वाहनांचा छडा लावणे शक्य आहे.मध्यंतरी वणी पोलिस ठाण्यात दुचाकी चोरणाऱ्याना ताब्यात घेतले होते तसेच त्यांच्याकडील दुचाकीही जप्त करण्यात आल्या होत्या. लहान मुलेही दुचाकी चोरीमध्ये आढळत असून गुन्हेगारीही वाढत आहे. त्यामुळे पोलिस विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
परंतू वणी ठाण्यात कारभार चालतोय अपुऱ्या मनुष्यबळावर आहे यात शंका नाहीच.डीबी चा ‘दोन दोन टीम ‘…. ‘दम मारे दम ‘ क्या करे हम अशी स्थिती. कारण गुन्हे वाढत आहे त्यावर नियंत्रण करणे अवघड व्हायला लागलें. तरीही पथक काम करण्यास आगेकूच करीत असल्याचेही चित्र दिसत आहे.