Friday, May 1, 2026
HomeBreaking News"दिलीप" वर हातोडीने सपासप वार .....

“दिलीप” वर हातोडीने सपासप वार …..

Ajay Kandewar,Wani:- शहरातील सावरकर चौक परिसरात १ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने मैत्री नात्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दिलीप नासरे (वय अंदाजे ४५ रा. सुभाषचंद्र बोस चौक परिसर) यांच्यावर त्यांच्या परिचयातीलच संदीप साखरकर (वय अंदाजे ३० रा. सावरकर चौक) याने लोखंडी हातोड्याने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप नासरे हे इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती करणारे कुशल कारागीर असून त्यांनी काही वर्षांपूर्वी आपले दुकान विकल्यानंतर घराघरांत जाऊन काम करण्याचा व्यवसाय स्वीकारला होता. दरम्यान, त्यांचा जवळचा मित्र म्हणून ओळख असलेल्या संदीप साखरकर याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर संतापात झाले आणि संदीपने दिलीप यांना आपल्या घराजवळ बोलावून घेत, अचानक हल्ला करत त्यांच्या डोक्यावर हातोड्याने वार केल्याचे समोर आले आहे.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दिलीप नासरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी संदीप साखरकर याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page