•गावात शोककळा पसरली.
अजय कंडेवार,वणी:- राहत्या घरी चार दिवसाआधीं महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्या महिलेच्या अखेर दि.18 डिसें.रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनीषा विजय नक्षीणे वय.(40 वर्ष) रा. वांजरी, ता.वणी असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचा नाव आहे.
मनीषा विजय नक्षीणे( वय 40) रा. वांजरी या महिलेनी 14 डिसे.रोजी घरातच औषध प्राशन केले होते. कुटुंबियांना माहिती मिळाली असताच त्यांनी तात्काळ तिला शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांचे तीचावर उपचार सुरु असताना सोम. 18 डिसे. रोजी दुपारच्या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू बाबत वणी पोलीस स्टेशनला माहिती दिली असता पोलिसांनी पंचनामा करून पोस्टमार्टम करीता मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तिचा मृत्युचा पश्चात पती व एक मुलगा असा आप्त परिवार आहेर