Wani :- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४-२५ खरीप २१४०० शेतकऱ्यांनी १ रुपया मध्ये पिकविमा उतरविला तसेच मागील हंगाम २०२३-२४ मध्ये कापुस, सोयाबिन, तुर पिकाकरीता २८४९१ पिकविमा उतरवीला त्यापैकी ८४६९ दावे रह २००२२ मंजुर पैकी १४२५७ लोकांना २० कोटी रुपये वाटप झाले ५७६५ शेतकऱ्यांना १००० रुपयाखाली व बँक बरोबर नाही. या कारणामुळे अजुनही पिकविमा धारक शेतकऱ्यांना १ वर्षे लोटुनही पिक विम्याची रक्कम विमा धारकाला दिली नाही. हंगाम २०२३-२४ नैसर्गीक आपत्ती पुरहानी नाही १००% नुकसान असतांना तुटपुंजी रक्कम देवुन शेतकऱ्याची फसवणुक केली आहे. हंगाम २०२४-२५ मध्ये जिल्ह्यामध्ये सततचा पाऊस ढगफुटी, अत्तीवृष्टी यामुळे जमिनीतील सततचा ओलावा सोयाबीन पिकाची वाढ नाही शेंगा नाही. उत्पादनावर विवरीत परिणाम या करीता जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी ५०% पेक्षा कमी उत्पन्न असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ११० महसुल मंडळात ३०-९-२०२४ अधिसुचना काढून २५% आगायु रक्कम पिकविमा धारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश केले परंतु आज सोयाबिन हगांम संपलातरी शेतकऱ्यांना २५% व उर्वरीत ७५% यापैकी कुठलेही भरपाई दिली नाही. प्रशासन आदेशाची अवहेलना ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे पिकविमा, ई-पिक नोंद अर्थसहाय, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी माजी जि प सदस्य विजय पिदुरकर यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदनातून केली आहे.
वणी तालुक्यात वाहणाऱ्या वर्धा, पैनगंगा, निर्गुडा, विदर्भ नदी व नाल्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांची शेतपिक कापुस, सोयाबीन, तुर माहे. जुलै, ऑगष्ट, सप्टेंबर पुराच्या पाण्यात वाहुन खरडुन गेले सोबतच अतिवृष्टीमुळे सर्वत्र दलदल निर्माण झाल्याने झाडाना फळधारना न झाल्याने शेतपिकाची अपिरीमीत नुकसान झाले नैसर्गीक आपत्ती मदत धोरणानुसार नुकसानी पासुन २ महिन्याच्या आत शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षीत होते जेनेकरुन त्याला नविन हंगाम करण्याकरीता मदत झाली असती जनेकरुन त्याला बाजारातुन कर्ज काढुन बि, बियाने मशागत पेरणीकरीत कर्ज काढून मानसिक तनावात जगावे लागत आहे.
त्यामुळे या सर्व बाबींचा प्राधान्याने विचार करुन शेतकऱ्यांला मदत होण्याच्या दृष्टिले अतिशिघ्र कार्यवाही करावी अन्यथा अन्यायाच्या विरुध्द न्यायासाठी लोकशाही मार्गाने न्याय हक्क मागणी करीता तिव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा मागणीचे निवेदन माजी जि प सदस्य विजय पिदुरकर यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना दिले आहे.