Ajay Kandewar,Wani:- वेळाबाई, मोहदा, कृष्णानपूर येथील नागरिकांना शिरपूर -वणी राज्यमार्ग व कायर मार्गावर दुचाकी,चारचाकी वाहनाने विद्यार्थी,आजारी रुग्ण,गरोदर माता ,दैनंदिन प्रवासी बैलबंडीधारक ,शेतकरी, शेतमजूर ,महिला व पुरुष यांना दैनंदिन कामाकरिता या रस्त्याचा वापर करणे कठीण झाले आहे. वेळोवेळी प्रवास करताना अनेकांना अपघातात अपंगत्व आले व जिवीतहानी झाली पण कुंभकर्णी झोपेत असलेले बांधकाम विभाग जागे होण्यास तयार होत नव्हते शेवटीं सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सूरू करणार याबाबतचे लेखी पत्र दिलें आणि तरीही रस्ताकामं सूरू करण्यात आले नाहीं आणि ग्रामस्थांची फसवणुक झाल्याचे लक्षात आले.म्हणून बांधकाम विभागाविरोधात रस्ता बांधकामाची सुरुवात व्हावी, याकरिता वेळाबाई बसस्टॉप जवळ लोकशाही मार्गाने दिं.17 डिसें रोजी समस्त वेळाबाई व मोहदा ग्रामवासीयाकडून “चक्काजाम आंदोलन”(दिं १७) आजपासून सुरू झाले.
या चक्काजाम आंदोलनाला अनेक संघटनांनी त्यात सरपंच संघटना, सामाजिक संघटना तसेच दोन्ही गावातील नागरिकांचा वाढता पाठींबा लक्षात घेता.त्या सुरू असणाऱ्या आंदोलनाला सर्वत्र कौतुक होत तर आहेच पण कुरघोडी करणाऱ्या काही विरोधक माञ आपली पोळी शेकून बसूनही आहे अशीही चर्चा आहे. मोहदा सरपंच, उपसरपंच व वेळाबाई सरपंच, उपसरपंच हे नेहमीच गाव हितासाठी अग्रेसर असतात पण काही सदस्य मात्र त्यांना हे चांगल केलेल खुपुन राहत असते मात्र एक खरे की “ये पब्लिक हैं सब जानती “कोण काम का और कोण धन का?… त्या काहीना येनाऱ्या निवडणूकीत दिसणारच यात शंका नाहीच . हल्ली एक माहिती मिळाली आहे की, पुन्हा त्या PWD विभागाने लेखी पत्र दिले आहे मात्र त्या पत्रात खोडतोड पणा करून काहीही थातुरमातुर पेंनिने लिहून देण्यांत आलें त्या शासकीय विभागाला हेही भान विसरले की पत्रात खोडसरपण नसावं कदाचित अधिकारी शिकले नसावे म्हणून त्यातही एक गलथन कारभार या विभागाचा उघड झाला आहे .