अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील विदर्भा नदीपात्र व पैनगंगा नदीपात्रातून नेरड,पुरड,कुंड्रा,चिलई,तेजापुर व आमलोन गावातील रेती चोरटे वणी महसूल यंत्रणेच्या नाकावर टिच्चून रेतीचे उत्खनन केले जात आहे. ट्रॅक्टरने अहोरात्र रेतीची तस्करी सुरू आहे. मात्र, त्याकडे कुठलेही लक्ष “मलाई खाऊ “यंत्रणा देत नसून जोमात रेतीतस्करी होत आहे.
वणी महसूल यंत्रणेच्या कार्यक्षेत्रात रेतीतस्करी अति वाढले आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागातील (नेरड, पुरड, कुंड्रा, चिलई,तेजापुर व आमलोन)रेतीतस्करीने कळस गाठला आहे. ट्रक, ट्रॅक्टरने रेतीतस्करी सुरू आहे. महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी रेतीतस्करांनी स्वतःची यंत्रणा उभी केली. विदर्भा नदीपात्रात दररोज तस्करी होत आहे. प्रामुख्याने या नदीपात्रात रेती उत्खनन करून गावातीलच नामवंताने नेल्याचे जीवंत पुरावे “विदर्भ न्युज” कडे आले आहेत. मात्र त्याकडे यंत्रणेतील तलाठी,मंडळअधिकारी, कर्मचारी अर्थपूर्ण लक्ष देत नाहीत. एकब्रास रेती आठ हजाराने विकली जात आहे. त्यामुळे शासनाच्या रेती निर्गती धोरणाचा फज्जा उडाला आहे. ६५० रुपये ब्रासने रेती देऊ, असे सांगण्यात आले होते. मात्र, बांधकामावर महागडी व अवैध चोरट्या पद्धतीने रेती पोहचविल्या जात आहे. काही शासकीय कामांवरही चोरट्या रेतीचा वापर होत असल्याने शासनाच्या रॉयल्टीचे नुकसान होत आहे.
“प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र ते तलाठी, मंडळ अधिकारी प्रतिटॅक्टर याप्रमाणे माया गोळा करीत असल्याने त्याबर कुणाचे नियंत्रण का नाही, ही बाब सामान्य नागरिकांनाही समजत आहे. जिल्हाधिका-यांसह अपर जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारीनीही वणी तालुक्यातील रेतीतस्करीकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच त्या तलाठ्यांवर थेट कारवाई करून त्यांचात असणारा “मलाई खाऊ “गुण कमी होणार यात शंका नाहीच.”