Ajay Kandewar,Wani :- पोलीस स्टेशन वणी हद्दित दि.26 फेब्रुवारी रोजी स्थानिक वणी शहर व ग्रामीण भागामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. त्या अनुषंगाने वणीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वणी ठाणेदार P.I गोपाल उंबरकर यांनी 1 दिवसाचा ‘ड्राय डे’ (Dry Day) म्हणून आदेश जारी केला आहे.
देशभरात सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळेल. ‘शिवाची महान रात्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाशिवरात्री निमित्त अनेक भाविक भगवान शंकराची पूजा-प्रार्थना करतात. महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व मोठे असले तरी आजचा दिवस हा वणी ठाणेदार P.I उंबरकर यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी यांनी काहीं ठरवून दिलेल्या अधिकाराने महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 142 (2) झालेल्या अधिकारान्वये सर्व सि.एल.ए एल-अ.सि एल-2 एफ.एम-2 बियर शॉपी बंद करण्याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे म्हणून आजचा दिवस हा वणी शहर व ग्रामीण साठी ‘ड्राय डे’ म्हणून पाळला जाणार आहे. यासाठी आज तळीरामांचे वांदे होणारं आहे.