अजय कंडेवार,Wani :- कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर, नेतृत्वावर आणि विचारावर विश्वास ठेवत वणी तालुक्यातील साखरा (दरा) व साखरा (पोड) येथील शेकडो तरुणांनी माजी आ.वामनराव कासावार यांचा नेतृत्त्वात राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांच्या पुढाकारावार अतूट विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात 16 सप्टेंबर रोजी जाहीर प्रवेश केला.
काँग्रेस हेच देशाला तारु शकते हे वारंवार सिद्ध झाल्याने तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.केवळ काँग्रेस हेच सर्वसामान्यांचे, दिन दुबळ्यांचे, आदिवासींचे हित साधू शकते. याच उद्देशाने तरुणांनी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश घेतला.
यावेळी डॉ. मोरेश्वर पावडे, घनश्याम पावडे, ओम ठाकूर, राजू कासावार, मंगल मडावी, अशोक पांडे, रवि देठे, प्रवीण आत्राम, गजानन नांदेकर आदिंची उपस्थिती होती.