अजय कंडेवार,Wani:- राज्य सहकार विभागाच्या सूचनेनुसार श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकार पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वसंत जिनिंग हॉल येथे रविवार १५ सप्टे.दुपारी १२.वाजता संस्थेचे अध्यक्ष ॲड.देविदास पांडुरंग काळे यांच्या अध्येक्षतेखाली संपन्न झाली व वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत सभासदांना ३ टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले.
राज्य सहकार विभागाच्या सूचनेनुसार श्री.रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेच्या पार पाडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत सभासदांना ३ टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष देविदास पांडुरंग काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या मागील आर्थिक वर्षाचा आढावा घेण्यात आला.
“३१ मार्च २०२४ अखेर संस्थेचे ८१५२७ सभासद असून एकूण उसूल भाग भांडवल ३८ कोटी ०५ लाख आहे. संस्थेकडे मार्च अखेर ७९७ कोटी ९१ लाख इतक्या ठेवी असून, संस्थेने स्वभांडवलातून व स्वनिधीतून सभासदांना विविध कर्ज प्रकारातून ४७० कोटी ८४ लाख कर्जवाटप केले आहे.श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकार पतसंस्थेने सभासदांना ३ टक्के लाभांश जाहिर केले .संस्थेने विविध बँकांमध्ये १८५ कोटी ५४ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. संस्थेचे खेळते भांडवल ८८५ कोटी २९ लाख रुपये असून, संस्थेस मार्च अखेर २कोटी ११ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. संस्थेने सभासदांना ३ टक्के लाभांश घोषित केले आहे. संस्थेचे सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असून, संस्थेस ‘अ’ वर्ग मिळाला आहे. संस्थेने सध्या ७९७ कोटी ९१ लाख ठेवी, ४७० कोटी ८४ लाख रूपये कर्जाचा टप्पा पार केला आहे.”
या सर्वसाधारण सभेचे प्रास्तविक संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी केले तसेच यवतमाळ जिल्हा सहकार बोर्डचे तज्ञ संचालक के. आर. नगराळे यांनी सभेला मार्गदर्शन केले. वार्षिक अहवालाचे वाचन संस्थेचे संचालक परीक्षित एकरे यांनी केले. विषयसूचीचे वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांनी केले तसेच सभेचे संचालन पायल परांडे यांनी केले व संस्थेचे संचालक सूरेश बरडे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी देविदास काळे,विवेकानंद मांडवकर,परीक्षित एकरे, सुधीर दामले, हरिशंकर पांडे,रमेश भोंगळे,सूरेश बरडे, ऍड.घनश्याम निखाडे, डॉ.भुपाळराव पिंपळशेंडे, चिंतामण आगलावे, पुरुषोत्तम बद्दमवार,उदय रायपुरे, लींगारेडी अंडेलवार,अरविंद ठाकरे ,सुनिल देठे, छाया ठाकुरवार ,निमा जिवणे हे सर्व संचालक , कर्मचारीवर्ग , सर्व अभिकर्ते व सभासदगण या सभेला उपस्थित होते.