अजय कंडेवार,वणी :- मध्यंतरी नायगाव झोला शिवारातील (वर्धा नदीच्या पात्रात सावर्ला शिवार) वर्धा नदीच्या पात्रातून चाललेल्या रेती तस्करीवर धाड टाकून कारवाई झाली. मात्र तिथे पकडलेल्या अजस्त्र यंत्रांच्या मालकांवर गुन्हे नोंदविले गेले नाही. एका हायवा ट्रकसह जेसीबी जप्त करून अत्यंत साधा दंड या प्रकरणात आकारला गेला आणि तलाठी व मंडळ अधिकारी मोकाट असल्यानं परिणामी, त्याची तक्रार थेट महसूल मंत्र्यांकडेही झाली. मात्र हे प्रकरण आर्थिक उलाढालीतून दडपले गेल्याची चिन्हे असून आता २० जूनला या संदर्भात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्यावर गुन्हे नोंदविण्यासाठी पुन्हा तक्रार झाली. आता वर्धा नदीच्या पात्रात सावर्ला शिवारात पोकलॅण्ड मशीनद्वारे रेतीचे अवैध उत्खनन करण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीत उमेश पुरुषोत्तम बोढेकर रा. पाटाळा, मुरलीधर सीताराम गेडाम रा. झोला व मतीन अहेमद शेख अहेमद रा. चंद्रपूर हे तिघे दोषी आढळल्याने यांना एक कोटी १४ लाख ८७ हजार ३१९ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम सात दिवसांच्या आत भरण्याचे आदेशही वणी तहसीलदार यांनी दिलें.पण तलाठी व मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्यावर “विवेकबुद्धीने ” मेहेरबान का? असा स्पष्ट सवाल उपस्थित झाला आहे. घर की मुर्गी दाल बराबर अशिही जोरदार चर्चा होऊ लागली
वर्धा नदीचे पात्र अक्षरशः काही रेती तस्करांनी पोखरून काढले. वणी महसूल विभागासह पोलीस यंत्रणेने रेती तस्करावर फारशी गांभीर्याने कारवाई केली नाही. एसडीओंसह तहसीलदार गौण खनिजाच्या उत्खनन व चोरी प्रकरणासंदर्भात जराही गंभीर नसल्याचे पुढे आले. प्रामुख्याने मध्यंतरी वर्धा नदीपात्रातील झोला घाटातून रेती तस्करी अव्याहतपणे सुरू होती. नागरीकांच्या तक्रारीमुळे तिथे धाड टाकण्यात आली. त्यामध्ये एका हायवा ट्रकसह जेसीबी यंत्र जप्त करण्यात आले होते. मात्र संबंधित रेती तस्करांवर कुठलाही गुन्हा न नोंदविला नव्हता.त्यामुळे युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यामध्ये ६ एप्रिलच्या रात्री वणी तहसीलदारांनी धाड टाकून जप्त केलेल्या साहित्यांसह दंडाचा विषय नमूद केला होता. त्या प्रकरणाच्या चौकशीत उमेश पुरुषोत्तम बोढेकर रा. पाटाळा, मुरलीधर सीताराम गेडाम रा. झोला व मतीन अहेमद शेख अहेमद रा. चंद्रपूर हे तिघे दोषी आढळल्याने यांना एक कोटी १४ लाख ८७ हजार ३१९ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. परंतु झोला घाट पूर्णतः पोखरून काढल्यानंतरही त्या भागातील मंडळ अधिकारी व तलाठी अनभिज्ञ कसे, असा आक्षेप आहे. या घाटातून ४३७.०३ ब्रास रेती चोरी केली असतांना त्या तिघांवर दंडात्मक कारवाई होतें अन् त्या कार्यक्षेत्रात महसूल विभागाचे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर अद्यापही नीलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही हे अद्यापही न समजणारे कोडच म्हणून मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठ्यावर गुन्हे नोंदविण्याची मागणीही सदर पदाधिकाऱ्याने केली होती. दरम्यान, २० जूनला पुन्हा एक तक्रार दाखल झाली. एसडीओंसह जिल्हाधिकाऱ्यांकडे झोला गावातील ग्रामस्थांनीही तक्रारी नोंदवून महसूल कर्मचाऱ्यांवर(तलाठी व मंडळ अधिकारी) कारवाईची मागणी केली. मात्र, संबंधित महसूलचे कर्मचारीच आपण साहेबांना मोठी रक्कम मोजल्याचे खासगीत बोलल्या जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची वास्तविकता शोधून संबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबन व्हावे, अशीसुद्धा मागणी आहे.

