अजय कंडेवार,वणी:- विविध शासकीय योजनांचा प्रचार, प्रसाराबरोबर सहभाग तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध योजना संदर्भात माहिती पुरविण्याकरीता दिलीप राऊत तालुका कृषि अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनात “शेतकरी मागदर्शन सभा” ९ जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते.

शेतकरी बाधवांनी लाभ घेण्याचे आव्हान….
“शेतकरी मागदर्शन” सभेत उपकृषी अधिकरी ए.डी. कन्नाके यांनी फार्मर.आय.डी काढणे संदर्भात चर्चा व मार्गदर्शन केले तसेच 100% शेतकरी बांधवानी तात्काळ फार्मर.आय.डी काढणे करीता आव्हान केले.सहायक कृषी अधिकरी एम.आर.पत्रे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना जसे की MREGS फळबाग लागवड योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, बांबु लागवड योजना, तुती लागवड योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत शेततलाव, यांत्रिकीकरण, PMFME योजना ईत्यादी सर्व योजनांची माहीती या वेळी उपस्थित शेतकरी बाधवांना देऊन जास्तीत जास्त योजनांचा लाभ शेतकरी बाधवांनी घेण्याचे आव्हान केले.
तसेच सहायक कृषी अधिकरी, यु.एम.वाघमारे यांनी किटकनाशके खरेदी करतांना घ्यावयाची काळजी व विषबाधा होऊ नये याकरीता फवारणी करतांना घ्यावयाची काळजी तसेच विषबाधा झाल्यास प्रथम उपचार या बाबत मार्गशर्दन करुन प्रात्याक्षिक करुन दाखविले. यावेळी गावचे उपसरपंच सचिन रासेकर यांचे हस्ते नेहमी फवारणीस जाणा-या शेतमजुरास किटचे वाटप करण्यात आले.या मार्गदर्शन सभेकरीता गावचे उपसरपंच सचिन रासेकर, सहायक कृषि अधिकारी एम.आर.पत्रे, ग्रामपंचायत कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्व शेतकरी बांधवांचे सहकार्य लाभले.

