Ajay Kandewar,Wani:- जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात अवघ्या 24 तासात वणी डीबी पथकाला यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती ठाणेदार अनिल बेहरानी यांनी रविवारी दिली.
सविस्तर,किशोर रामचंद्र ठावरी (51) रा. नवरगाव हे शुक्रवार (दिं.10) रोजी बसस्थानकाकडे पायदळ जात असताना दोन दुचाकीस्वार त्याच्याजवळ आले आणि विचारणा केली की, कुठ जायचं आहे तेवढ्यात किशोर यांनी नवरगावला जात असल्याचे सांगितले. त्यावर या दोघांनी म्हटले,” आम्हीं तिकडेच चाललो” असे म्हणून त्याला गावी सोडून देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसविले. वणी- मुकुटबन मार्गाने दुचाकी नेतांना त्यांनी १८ नंबर या रेल्वे पुलापासून मेंढोली या गावाकडे दुचाकी वळविली आणि अंतरावर गेल्यानंतर दुचाकी चालकाने दुचाकी थांबवून किशोर ठावरी यांना बेदम मारहाण केली. त्याचाजवळील नगद 4 हजार 800 रुपये व विवो कंपनीचा मोबाईल बळजबरी हिसकावून तेथून पसार झाले. किशोर ने वणी पोलिस स्टेशन गाठले व आपबिती घडलेला प्रकार रीतसर जुबानी बयान नोंदवित तक्रार दाखल केली.सदर गुन्हयाची माहिती पोलीस ठाण्यात प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस निरीक्षक यांचा मार्गदर्शनाने डी.बी पथकाने घटनास्थळी धाव घेवुन माहितीच्या आधारे चक्रे फिरवित आरोपीचा शोध घेऊन अवघ्या 24 तासाचा आत वणी पोलिसांनी जबरी चोरी मधील दोन्ही आरोपी 1)अशफाक ऊर्फ अय्या खान साहेब खान पठाण (28 वर्ष) रा.खरबडा , वणी 2) मोहम्मद जुबेर अब्दुल सलाम (38) रा. रंगनाथ नगर,वणी असे आरोपीची नावे आहे.आरोपीना ताब्यात घेऊन जबरीने हिसकावून नेलेला VIVO कंपनीचा अंदाजे मो. कि. 2000 रू व रोख 1500 रूपये व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल बजाज डिस्कवर क्र.MH 29 AB 4682 सह कि.30 हजार रु ताब्यात घेतले.
सदरची कारवाई SDPO गणेश कींद्रे व वणी ठाणेदार P.I अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनात API धीरज गुल्हाने,विकास धडसे,श्याम राठोड,वसीम शेख,निरंजन, गजानन कुळमेथे व मोरेश्वर खडरे यांनी पार पाडली.