Ajay kandewar,Wani:-राजकारणात अनेकदा पदे, सत्ता, मोठमोठ्या घोषणा आणि ढोंगी आश्वासने दिसतात. पण काही मोजके नेते असे असतात की ज्यांची ताकद ही फक्त खुर्चीतून नाही तर जनतेच्या मनातून निर्माण होते. वणी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर हे असेच एक खंबीर, हसमुख आणि जनतेशी थेट नाळ जोडणारे नेते म्हणून आपणास माहीत आहेत.

2002 पासून आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता जनतेच्या प्रश्नांवर सतत लढणारा आणि प्रशासनाला जागं करणारा म्हणून ओळखला जातो. भाजपची सत्ता नसताना सुद्धा सलग दोनदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येण्याचा विक्रम विजय भाऊंनी केला. तिसऱ्यांदा त्यांच्या पत्नीने विजय मिळवत पिदुरकर कुटुंबाची लोकांमधील मजबूत पकड अधोरेखित केली.त्यांचा लाठी शिंदोला–शिरपूर शिंदोला गट हा विकासकामांचा गट म्हणून ओळखला गेला. गावोगावी रस्ते, विहिरी, पाणी, बससेवा, विद्यार्थ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न – हे सगळे मुद्दे त्यांनी प्रशासनाच्या दारात केवळ निवेदनाद्वारेच नव्हे तर नियमावर बोट ठेवून आणि पाठपुरावा करत नेहमी निकाली काढले. “जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत दम न सोडणे” ही त्यांची कार्यशैली आजही जनतेत चर्चेत आहे.ओबीसी व तळागाळातील बहुजन समाजाच्या हक्कांसाठी ते सतत लढले. शासनाच्या नवीन योजनांचा फायदा थेट शेतकरी व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा त्यांचा मुख्य ध्यास होता. त्यांची निवेदन लिहिण्याची शैली इतकी दमदार होती की, प्रशासनालाही ते लक्षात न घेता पर्याय नसे. पण कधीही उग्र भाषा किंवा धाक न वापरता, शांतचित्ताने प्रश्न सोडवणे ही त्यांची खासियत आहे.विजय भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद म्हणजे त्यांचा हसमुख चेहरा, सर्वांना आपलेपणाने जवळ घेण्याची वृत्ती आणि पक्षनिष्ठा. त्यांनी कधीही भाजपशी दगाफटका केला नाही. सत्ता नसताना देखील त्यांचा आवाज जिल्हा परिषदेपासून मंत्रालयापर्यंत ऐकला जात होता.
आज वणी विधानसभा क्षेत्रातील जनता विजय भाऊ पिदुरकर यांना केवळ एक माजी सदस्य म्हणून नव्हे तर खरा जनसेवक, गोरगरीबांचा आधारस्तंभ आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून जनतेसाठी लढणारा “डायमंड” नेता म्हणून पाहते. सामान्य नागरिकांना प्रशासनाशी जोडणारा पूल म्हणजेच विजय भाऊ – अशी त्यांची ठाम ओळख निर्माण झाली आहे.त्यांच्या कार्याचा मागोवा घेतला तर दिसते की, सत्ता ही लोकांच्या हृदयात असते, खुर्चीत नाही. आणि हीच खरी राजकारणातील ताकद आहे, जी आज विजय पिदुरकर यांच्या माध्यमातून वणी विधानसभा अनुभवते आहे.
“राजकारणात अनेक जण येतात, काही काळ ठसा उमटवतात आणि नंतर विस्मरणात जातात. पण काही नेते असे असतात, जे स्वतःपेक्षा समाजाच्या, शेतकऱ्यांच्या आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढत राहतात. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भाऊ पिदुरकर हे असेच ओबीसी समाजाचे खरे आवाज आणि शेतकऱ्यांचा भक्कम आधार म्हणून वणी तालुक्यात ओळखले जातात.”

