अजय कंडेवार,Wani:- 25 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी मधील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाचे संजय देरकर यांना उमेदवारी घोषीत केली.काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा वणी विधानसभा मतदारसंघ प्रथमच काँग्रेसच्या पंजाविना लढणार आहेत.आधी वणी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता परंतु संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सलग दोनदा निवडून येत काँग्रेसचे वर्चस्व संपूष्टात आणले होते. त्यामुळेच २०२४ च्या या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यंदाही जागा न मिळाल्याने काँग्रेसचा गट कमालीचा अस्वस्थ असून असंतुष्ट देखील झालें. त्यामुळं संजय खाडे बंडखोरीचे हत्यार उपसत अपक्ष राहणार असल्याने 28 ऑक्टोबर ला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडी साठी वणी विधानसभेतून पहिला झटका मिळणार असून गेल्या अनेक वर्षभरापासून वणी विधानसभा क्षेत्रात संजय खाडे हे कार्यरत आहे, क्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत खाडे यांनी पक्षाच “हात ” आणि पक्षाचे विचार पोहचविलें. विशेष म्हणजे त्यांनी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे निवडणुकीत आव्हान निर्माण करीत विधानसभा क्षेत्रात जनतेच्या हिताचे काम ही केले. जनतेचा सेवेसाठीच संजय खाडे निवडणुकीचा रिंगणात उतरले आहे.
पक्षाने संजय खाडे यांना तयारीला लागा असा आदेश दिला मात्र ऐनवेळी वणी विधानसभा सेनेच्या कोट्यात गेली. काँग्रेसचा गड लक्षात न घेता कार्यप्रणाली कोणाची काय? हे लक्षात न घेता तिकीट परस्पर फायनल केली. मात्र सदर बाब खाडे यांना खटकली आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आता वणी विधानसभा निवडणुकीत खरी चुरस बघायला मिळणार हे नक्की. विशेष बाब म्हणजे विदर्भातून महाविकास आघाडी मध्ये बिघाडीची सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 10 ते 12 ठिकाणीं बिघाडी झाल्याने बिघाडीने महाविकास आघाडीला फटका बसण्याची संकेत निर्माण झाले आहे.