Ajay Kandewar,Wani:- तालुक्यांतील सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सूरू करणार याबाबतचे लेखी पत्र देउनही रस्ताकामं सूरू करण्यात आले नाहीं आणि चक्क ग्रामस्थांची फसवणुक झाल्याचे लक्षात आले.म्हणून बांधकाम विभागाविरोधात रस्ता बांधकामाची सुरुवात व्हावी याकरिता वेळाबाई बसस्टॉप जवळ लोकशाही मार्गाने दिं.17 डिसें रोजी समस्त वेळाबाई व मोहदा ग्रामवासीयाकडून रस्ता “चक्काजाम आंदोलन”होणार असल्याचं आशयाचे पत्र ग्रामस्थांनी वणी उपविभागीय अधिकारी यांना दिलें.Aggressive stance of Velabai and Mohadavasi on Tuesday.
मागील दोन वर्षापासून हा रस्ता डोलोमाईट, गिट्टी, सिमेंट, वाहतुकीमुळे रस्त्यावर 2 ते 3 खोल आणि 10 ते 12 फुट रस्ता क्षतिग्रस्त झाल्याने या ठिकाणावरुन वेळाबाई, मोहदा, कृष्णानपूर येथील नागरिकांना शिरपूर -वणी राज्यमार्ग व कायर मार्गावर दुचाकी,चारचाकी वाहनाने विद्यार्थी,आजारी रुग्ण,गरोदर माता ,दैनंदिन प्रवासी बैलबंडीधारक ,शेतकरी, शेतमजूर ,महिला व पुरुष यांना दैनंदिन कामाकरिता या रस्त्याचा वापर करणे कठीण झाले आहे. वेळोवेळी प्रवास करताना अनेकांना अपघातात अपंगत्व आले व जिवीतहानी झालेली आहे. नागरिकांना वाहतूक योग्य रस्ता मिळणे हा मुलभूत अधिकार आहे परंतू बांधकाम विभाग व कारखानदार यांच्या बेजबाबदारपणामुळे धुळ प्रदुषण, इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामूळे नागरिकांच्या मनात बांधकाम विभाग व कारखानदारांबाबत रस्त्याची भारक्षमता कमी असताना जास्तभाराची (Overloaded ) वाहने गेल्याने रस्ता नादुरूस्त व धुळ प्रदुषणामुळे या रस्त्यावरुन प्रवास करण्यापेक्षा घरात मरणे बरे असा तीव्र संताप खदखदत आहे.यापूर्वी दिनांक 26-06-2024 ला आंदोलन मागे घेण्याकरिता 20 दिवसांची मुदत मागून सर्व ग्रामस्थांची फसवणुक केली. त्यानंतर आपणास 4 महिन्यांचा कालावधी लोटूनही रस्ता नुतनीकरणाचे काम केले नाही.निवडणुक आचार संहिता असल्यामूळे प्रशासनाला त्रास होईल याकरिता आंदोलन केले नाही. याचा ग्रामस्थानां सुविधा घेण्यांत कांही फायदा झाला नाही. या उपर दि. 09-12-2024 रोजी होणा-या रस्ता समस्या सोडविण्याकरिता निवेदन दिले. त्याच दिवशी बांधकाम विभागाने पाठविलेल्या जावक क. 652/तांत्रिक/दि.09-12-2024 रोजीचे पत्र पोस्टाने दि. 11-12-2024 रोजी प्राप्त झाले त्यांत 3 दिवसांची मुदत रस्त्याचे काम करण्याकरिता मागितली. ती मुदत सुध्दा 9 ते 12-12-2024 ला संपली. तरी पण रस्ता बांधकामाची दिरंगाई दिसून येत आहे.ही बाब अतिशय गंभीर आहे . ग्रामस्थांना हक्कांचा रस्ता हा अधिकार नाकारुन अन्याय करणारी बाब आहे. PWD चा लेखी विनंतीचा मान ठेवून दिनांक 1-12-2024 रोजी वेळाबाई बसस्टॉप जवळ आयोजित आंदोलन तात्पुरते स्थगित केलें होतें. मात्र दिनांक 13-12-2024 ला रस्ता बांधकामाची सुरुवात झालीच नाही आणि या बोगस pwd विभागाचे लेखी पत्र देउन चक्क ग्रामस्थांची फसवणुक करित असल्याचे लक्षात आले.म्हणून रस्ता बांधकाम या न्याय मागणीसाठी दि 17-12-2024 रोज मंगळवारला सकाळी 9.30 वाजता लोकशाही मार्गाने समस्त ग्रामवासी वेळाबाई, मोहदा रस्ता “रोको आंदोलनात” सहभागी करणार आहेत आणि या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन देखील या निवेदनातून उपसरपंच सचिन रासेकर यांनी केले. निवेदन देतेवेळी उपस्थित मोहदा सरपंच वर्षा राजुरकर, उपसरपंच सचिन रासेकर, वेळाबाई सरपंच रंजना शंकर बांदुरकर,रवि राजुरकर, जगदीश बांदुरकर, संदीप मेश्राम व ग्रामस्थ होतें.