Ajay Kandewar,वणी :- संतांचे कार्य मानव समाजासाठी असते. थोर संत संताजी जगनाडे महाराज यांनी समाज सुधारण्याचे कार्य केले. महाराजांची बुद्धिमत्ता फार मोठी होती. श्री संत तुकाराम महाराजांचे अभंग जतन करण्याचे कार्य संताजी महाराजांनी केले. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या ग्रुपचा आवारात मागील 10 वर्षाअगोदर उभारण्यात आलेल्या जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा पूर्णांकित पुतळ्याला MSPM संस्थेचे अध्यक्ष पी.एस.आंबटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करीत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन चरित्रावर शिक्षणसम्राट तथा संस्थेचे अध्यक्ष पी.एस.आंबटकर यांनी प्रकाश टाकला तसेच श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा ही देण्यात आलें.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी.एस.आंबटकर, पियूष आंबटकर,अंकिता आंबटकर,प्राचार्य, शिक्षकवृंद तथा विद्यार्थी उपस्थित होते.