Ajay Kandewar,Wani:- संस्थेचे माजी अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांचा संस्थेच्या संचालक मंडळात 1988 मध्ये पहिल्यांदा प्रवेश झाला. तेव्हापासून ते 2010 पर्यंत संचालक मंडळात होते. 2010 मध्ये त्यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले. या निवडणुकीत विजय मिळवत ते अध्यक्ष झाले होते तेव्हापासून त्यांच्या कार्यकाळात अनेक चढउतार आले. संस्था डबघाईला जात होती. त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेत संस्थेला उभारी देण्याचे काम केले.
जेव्हा ऍड. देविदास काळे हे संस्थेच्या संचालक मंडळात आले. तेव्हा संस्थेची परिस्थिती अत्यंत बिकट होती. कर्मचा-यांचे पगार देखील निघू शकत नव्हते. मात्र त्यांनी सूत्र हाती घेताच त्यांनी उत्पन्नाचे विविध स्रोत शोधले. त्यातून संस्थेची आर्थिक बाजू तर त्यांनी मजबूत केली सोबतच संस्थेचा झपाट्याने विस्तारही केला. संस्थेचा विस्तार जरी झाला असला तरी काळानुरूप संस्थेचे अस्तित्व टिकवून ठेवणे गरजेचे होते. जिनिंग, मंगल कार्यालय हे मेन्टनन्स व अपग्रेड न झाल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला. मात्र यातून ऍड देविदास काळे यांनी मार्ग काढला. वसंत जिनिंगच्या मालकीची वणी येथील यवतमाळ रोडवर जागा होती. ती जागा तब्बल 21 कोटी मध्ये विकली गेली. त्या रकमेचा मोठा फायदा संस्थेला झाला. त्यामुळे आज रोजी आर्थिक स्रोत वाढल्यानंतर आता संस्था कर्जमुक्तीच्या दिशेने पावले टाकत आहे. अश्या प्रसंगी एका छोट्या कारणाच मोठं कारण दाखवित थेट गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याची बतावणी करून ” दि.२ डिसेंबर रोजी वणी येथील वसंत जिंनिग प्रेसिंगचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकांच्या स्वाक्षरीचे पत्र अॅड. देवीदास काळे यांना संचालक पद रद्द केल्याचे सांगून पोस्टाने पत्र पाठविलें असे सांगितले.. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होतात की, अध्यक्षांना ऍड.काळे यांचे संचालक पद रद्द करण्यात एव्हढी घाई का दाखविली ? आजी अध्यक्षाचे माजी अध्यक्षाशी अशी वागणूक बरी का? ऍड. काळे यांच्यावरच एव्हढ अन्याय का? ऍड.काळे आजी अध्यक्ष यांना भारी पडत आहे का? असे अनेक प्रश्न कोडच आहेत. परंतु कोणतीही परिस्थिती व नियम न जाणून घेता अध्यक्ष महोदयांनी असे कृत्य करणे चुकीचे असे सध्या जनतेतून बोलल्या जात आहे.
कोड…..
वसंत जिनिंगच्या अध्यक्षाला किवा व्यवस्थापकाला पत्र देऊन एखाद्या संचालकाला काढता येत नाही. त्याची एक प्रक्रिया आहे. नियमानुसार, मला अध्यक्षांनी कारणे दाखवा नोटीस देणे गरजेचे होते.परंतु मला आतापर्यंत यासंदर्भातील कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नाही. सहा बैठकींपैकी चार बैठकांसंदर्भात मला सूचनाच देण्यात आली नव्हती.हा सर्व प्रकार राजकीय सूड बुद्धीतून खेळण्यात आलेला खेळ आहे.मुळात पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सहायक निबंधकांकडे मंजुरीसाठी पाठवावा लागतो.- ऍड देविदास काळे
🛑नवख्यांना वसंत जिनिंग का बर पाहिजे ? वाचा…..!
आज संस्थेच्या वणी, मारेगाव, मुकूटबन, शिंदोला व मार्डी अशा 5 ठिकाणी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आहे.तसेच वणी,कायर, शिंदोला, घोंसा, मारेगाव, मार्डी, मुकूटबन या 7 ठिकाणी संस्थेचे कृषी केंद्र कार्यरत आहे.याशिवाय वणी येथे शेतकरी मंदिर सभागृह, वसंत जिनिंग हॉल व लॉन तर मारेगाव येथे मंगल कार्यालय आहेत. हे सध्या संस्थेचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. आज संस्थेकडे 22 कोटी, 50 लाख 8 हजार 919 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर संस्थेवर फक्त 1 कोटी 75 लाख रुपयांचे कर्ज आहे. संस्थेमध्ये सध्या 20 कर्मचारी नोकरीवर आहेत. तर आज संस्थेचे सुमारे 11 हजार सभासद आहेत.
🛑•वसंत जिनिंगच्या संचालकांचे दोन गट…….
” दि.२ डिसेंबर रोजी वणी येथील वसंत जिंनिग प्रेसिंगचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकांच्या स्वाक्षरीचे पत्र अॅड. देवीदास काळे यांना संचालक पद रद्द केल्याचे पाठविलें अस सांगितले. पण महत्वाचे एक असे की,वसंत जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचे ते सलग दहा वर्षे अध्यक्ष राहिले त्यांचा काळात कधीही एव्हढी अध्यक्षतागिरी दाखविली नाहीं आणि स्वतः कुणाचं वाईट व्हावं हे मनात देखील आणले नाही. पण मागील एका वर्षापासुन वणी येथील वसंत जिनिंगच्या संचालकांचे दोन गट पडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या दोन गटांत आगेकूच पणा सुरूच आहे, नेमक वसंत जिनिंग मध्ये चाललय तरी का?” आणि आजी अध्यक्षांना माजी अध्यक्ष का भारी पडू लागले..हा अनुत्तरीत कोडच आहे.