•कायरची ग्रामसभा सरपंच व सचिव यांच्या दमदाटीतुन स्थगित……
• ग्रामस्थांचा केला अवमान सचिव व सरपंचावर फौजदारी गुन्हा दाखल करा- ग्रामस्थ
अजय कंडेवार,वणी – कायर येथे दिनांक 23 सप्टेंबर2022 रोजी सकाळी 9.00 वाजता ग्रामसभेचे आयोजन केले. या सभेत येण्याकरिता ग्रामपंचयत कर्मचाऱ्यांनी ग्रामवासीयांना सभा सुरू होण्यापूर्वी 100 रुपये देऊन सभा रजिस्टर वर सह्या घेतल्या व ग्रामसभेतील ग्रामस्थांना दमदाटी देऊन सरपंच व सचिव यांनी सभा स्थगित करून दोघेही सभा सोडून पळाले .यामुळे ग्रामवासीयांचा अवमान झाला याबाबतचे निवेदन ग्रामवासी यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ याना पाठविण्यात आले.
” सभा तहकूब करण्याचा विरोधकांनी खूप प्रयत्न केले. विशेष आम्हीं सर्व कर्मचारी व ग्रामस्थ सभा घेण्यासाठीच बैठक लावली होती. परंतू विरोधक काही गटानी पूर्वनियोजित कटकारस्थान रचला व ग्रामसभा न होऊ देण्यात अयशस्वी प्रयत्न केले व ग्रामसभेत विनाकारण राडा केला.” – (नितीन दखने, कायर सरपंच)
“
दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोज सकाळी 9.00वाजता ग्रामसभा ग्रामपंचायत कायर यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती . पण सकाळी 9 वाजता ग्रामसभेत कुठलेही आयोजन करण्यात आले नव्हते आणि 11.00 वाजता ग्रामसभा लोकांच्या आग्रहांतर सचिव व सरपंच दोघेही ग्रामसभा घेण्याकरिता सभेसाठी येऊन बसले त्या अगोदर ग्रामपंचायत कर्मचारी विठ्ठल दशरथ जींनावार यांनी नागरिकांना प्रत्येकी 100 रुपये देऊन ग्रामसभा रजिस्टर वर सह्या घेतल्या याप्रमाणे जवळपास ग्रामपंचायत मध्ये बसून सरपंच व सचिव यांनी ग्रामपंचायत कर्मचारी शंकर सोयाम यांच्या मार्फत सभा रजिस्टर वर सह्या घेतल्या त्यानंतर सरपंच उपसरपंच व सचिव हे ग्रामसभेत येऊन बसले तेव्हा त्यांनी सांगितले की 84 सह्या झाल्या आहे.
अजून कोरम पूर्ण झाला नाही असे म्हटले असता उपस्थित ग्रामस्थांनी आम्ही सर्व सह्या करण्यास तयार आहे व कोरम पूर्ण करून सभा सुरू करा परंतु सरपंच व सचिव यांनी हजेरी पुस्तक व रजिस्टर ताब्यात घेऊन सभा तहकूब झाली असे सांगून निघून गेले.त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांचा अवमान झाला आहे यापूर्वी सरपंच व सचिवांने खोट्या सह्या घेऊन दारू दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र दिले होते परंतु चौकशी नंतर दोन्ही ठराव रद्द करण्यात आले. त्यामुळे काहीतरी घालमेल करून नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी खटाटोप सुरू आहे…. आजच्या ग्रामसभेत विषय पत्रिकेवर दारू दुकानाची कसलीही माहिती नाही. परंतु पुन्हा ग्रामसभेचे आयोजन करून ठराव घेण्याची दाट शक्यता आहे. करिता हा ग्रामस्थांचा झालेला अवमान असून ग्रामसभेचा अवमान करणारे सरपंच नितीन दखणे ,उपसरपंच व सचिव खैरे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. संबंधित निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, गटविकास अधिकारी प. स वणी, पोलिस निरीक्षक गजानन करेवाड शिरपूर पोलीस स्टेशन याना देण्यात आले.