Ajay Kandewar,Wani :- मोहदा गावातील सरपंच राजुरकर व उपसरपंच सचिन रासेकर यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत कार्यालय, मोहदा पंचायत समिती वणी तर्फे स्वच्छ भारत,एक कदम स्वच्छता की ओर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत किशोरवयीन मुलींची कार्यशाळा, कचरा कुंडीवाटप व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन गुरुवार दि ९ जानेवारी २०२५ वेळ, सकाळी ११.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालयाचा प्रांगणात घेण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत किशोरवयीन मुलींची कार्यशाळा, कचरा कुंडी वाटप व स्वच्छतेविषयी मार्गदर्शनाचा कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच वर्षा रविंद्र राजुरकर असणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वणी पंचायत समिती गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार तर मार्गदर्शक म्हणून वणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे असणार आहे तसेच प्रमूख पाहुणे म्हणून PSI अश्विनी रायबोले, शिरपूर ठाणेदार माधवजी शिंदे ,सुभाष लोखंडे,सुषमा अरके,मनोज उरकुडे,राहुल मानकर,श्रीराम वाघमारे , सदस्य,अगंणवाडी सेविका, आशा वर्कर व तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित असणार आहे तरी या कार्यशाळेला समस्त गावातील ज्येष्ठ महीला , विद्यार्थी व गावकरी महिला यांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आले आहे.