Tuesday, July 15, 2025
HomeBreaking Newsकुऱ्हाडीने वार अन् जागीच ठार....!

कुऱ्हाडीने वार अन् जागीच ठार….!

15 ते 20 सपासप वार….

माणिक कांबळे/ मारेगाव:- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या मार्डी येथे एका युवकावर कुऱ्हाडीने प्राण घातक हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.He was stabbed with an ax and killed on the spot.. 15 to 20 Sapasap strokes….

कैलास उर्फ गोलू बंडू सोयाम (मजरा) असे प्राणघातक हल्यात ठार झालेल्या युवकांचे नाव आहे.तर
प्रदीप गोविंदा भारशंकर (मार्डी) असे कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव आहे. मार्डी येथे दर बुधवारला आठवडी बाजार भरतो ग्रामीण भागातून नागरिक येथे बाजारसाठी येत असताना बाजारात ही घटना घडली.हल्लेखोराने प्रथम या युवकासोबत वाद घातला त्यानंतर वचपा काढण्यासाठी त्याने घरून कुऱ्हाड आणली आणि कुऱ्हाडीचे 15 ते 20 घाव त्याच्या शरीरावर घातले यामध्ये हा युवक गभीर अवस्थेत धारातीर्थ कोसळला.

घटनेची माहिती मारेगाव पोलिसांत दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले असून ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्या चमुने घटनास्थळ पंचनामा करून जखमीला पुढील उपचारासाठी वणी येथे हलविले मात्र या युवकाने रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला आहे.घटनेतील हल्लेखोर प्रदीप भारशंकर यास तात्काळ अटक करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments