•ग्रामपंचायतचा “बेमुदत रास्ता रोको”आंदोलनाचा एल्गार.
•गावकरी भोगताहेत मरणयातना .
अजय कंडेवार,वणी :- यवतमाळ रोडवरील लालपुलिया – चिखलगाव – कळमना (खुर्द) या रस्त्यावर मुजोर प्रशासन म्हणून परिचित असलेले “कार्तिकेय कोल वाशरी व परिसरातील कोल डेपो “बंद करण्याकरिता कळमना (खुर्द) या ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच,सदस्य व समस्त गावकरी यांनी आक्रमक पवित्रा घेत दि.23 नोव्हें.रोजी “बेमुदत रास्ता रोको” आंदोलनाबाबत वणी उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देत यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना साकडे घातले.
वणी तालुक्यातील कळमना (खुर्द) या परिसरात कोलवाशरी कंपनी तसेच कोल डेपो, रेल्वे सायडिंग आहे. त्यामुळे या मुख्य रस्त्याचे दररोज अवजड वाहनांची ५० ते ६० टनाची जड वाहतूक चालू असते.कोलवाशरी व कोल डेपो मध्ये येणारे अवजड वाहन क्षमते पेक्षा जास्त कोळशाची वाहतूक करीत असल्यामुळे हा रस्ता जमीन उध्वस्त तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी शाळेत जाण्यास पालकांना नकार देत आहे कारण रस्त्याची समस्या गंभीर झाली आहे .या खराब रस्त्यामुळे गावातील नागरिक तालुकाठिकाणी तसेच रुग्णांना गरोधर मातांना दवाखान्यात नेताना जीव मुठीत घेत प्रवास सहन करावा लागत आहे. विशेषतः रस्त्याची समस्येबाबत कार्यालयात 23 मे 2022ला माहिती देऊनही समस्यांचे निवारण करण्याबाबत अर्जही दिला होता, समस्या मार्गी न लागल्याने गावकऱ्यांनी 30 मे 2023 ला “रस्ता रोको” आंदोलन 4 दिवस केले होते, तरी या आंदोलननंतर जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील कार्यालयात गावकरी व आमदार बोदकुरवार याबाबत दालनात उपाययोजना म्हणुन सदर रस्त्याचे सिमेंट कॉक्रिटिंग करण्याचे ठरले होते. माञ दीड वर्ष होऊनही या रस्त्याबाबत कोणतेही उपाययोजना करण्यात आले नाही .तरी कळमना (खुर्द) गावाला येण्या जाण्याचा रस्ता नसल्याने गावकरी त्रस्त झाले आहे. गावकऱ्यांचा रोष साहजिकच ग्रा.पं.कळमना (खुर्द) पदाधिकारी यांच्यावर आहे.
कारण गरोधर माता यांना दवाखान्यात नेतांना तारेवरीत कसरत केल्याप्रमाणे या रस्त्याने जाव लागत आहे.तरी कळमना (खुर्द ) ग्रामपंचायत चे हद्दीतील कोलवॉशरी, कोलडेपो व रेल्वे सायडिंगवरील असणारी कोळश्याची वाहतूक बंद करण्यात यावी तसेच कार्तिकेय कोलवॉशरी सुद्धा बंद करण्याचे आदेश देण्यात यावे जेणेकरून हा रस्ता खराब होणार नाही, असे न केल्यास आम्ही कळमना (खुर्द) ग्रामवासी रस्त्यावर स्वतः उतरून ही होणारी वाहतूक दिनांक 27 नोव्हे रोजी बंद करुन 28 नोव्हे रोजी गावकरी व ग्रामपंचायतचा शेवटचा टोकाचे पाऊल उचलले असून “बेमुदत रास्ता रोको” आंदोलनाचे शस्त्र हाती घेतले.
निवेदन देताना सरपंच, उपसरपंच व समस्त गावकरी उपस्थित होते तसेच आमदार वणी विधानसभा क्षेत्र,उपविभागीय अधिकारी वणी, ठाणेदार पोलीस स्टेशन, वणी उपअभियंता जि.प.बांधकाम उपविभाग , वणी यांना निवेदनाचा प्रतिलिपी पाठविण्यात आले.