काय मटण.. काय चिकन.. रस्सा.. ओक्केमधेच हाय..!
•कायर येथे ‘एक पॅनल’ मतदारांना देत आहे मस्त मेजवानी अशी चर्चा…..
•शेतात पार्टी झाली का? मग पार्ट्याने ‘मतदार राजा’ विकला जाईल का?
•पार्ट्या देणारा ‘तो ‘गाव चेहरा कसा बदलेल स्पष्ट चिन्हं… मतदारराजा जागा हो !!!!!!
अजय कंडेवार,वणी:- कायर येथील निवडणूक जाहीर झाली अन् निवडणुकीची वाट बघून थकलेले भावी उमेदवार राजकीय आखाड्यात आले. मात्र, मतदारांना खुश करण्यासाठी आखाडीच्या पार्ट्याचा धुरळा आता उडू लागला आहे. सभा घेतल्याप्रमाणे इच्छूकांच्या आखाडीच्या पार्ट्या गावात सुरू झाल्यात. त्यामुळे “काय मटण.. काय चिकन… काय रस्सा.. ओक्केमधेच हाय’ असे म्हणत मतदार ताव मारताना दिसत आहेत.
विशेषतः गावातील एक पॅनल ठेकेदारकडून चालवित असल्याने पार्ट्या जोमात सुरू असल्याची खमंग चर्चा आहे परंतु गावात पार्ट्या देऊन मते घेतल्या जाईल का? हे देखील पाहणे गरजेचे आहे. कधी पार्टी शेतात तर कधी ढाबा येत देत असल्याचे बोलल्या जात आहे परंतु मतदार राजा विकला जाणारा नाहीच त्याला मतदान करताना गाव विकास करणारा चेहरा नक्कीच लक्षात आहे. गाव राजकारणात मतदार राजांना” तो पॅनल “लोभ देऊन मते विकत घेईल का? आणि गावात ठेकेदार राज् येईल का? हे सुद्धा बघणे गरजेचे आहे.
मतदारांसाठी काय पण हे लक्षात घेउन त्याला मटण, चिकण, मासे यांची मेजवाणी सुरु आहेत. इमारतीचे पार्कंग, टेरिस, आडोशाला असलेल्या पत्र्यांची शेड, शेतातील वस्ती या ठीकाणी होत असलेल्या आखाडींची चर्चा असून आज कोणाच हाय र.. हे कार्यकर्ते विचारुन निश्चीत करताना दिसत आहेत. प्रत्येक प्रभागातील चौकात चौकातून आता रात्री आठ नंतर मटन, चिकन, मासे याचा घमघमाट येऊ लागला आहे. हे चित्र गटारीपर्यंत वाढत जाईल यात शंका नाही. मतदार मात्र दर पाच वर्षातून येणाऱ्या या अनोख्या आखाडीचा आनंद लुटताना दिसत आहेत.परंतु एक प्रश्न नक्कीच उभा झाला आहे की,पार्ट्या देणारा ‘तो एक पॅनल ‘गाव चेहरा कसा बदलेल स्पष्ट चिन्हं… मतदारराजा जागा हो !!!!!! अशी सुज्ञ व्यक्तींची आर्त हाक आहे.