Ajay Kandewar,Wani:- नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस या निमित्ताने महाविकास आघाडीचे सर्व पक्षांची गटनेते विद्यमान आमदार यांनी विधानभवनाच्या पायरीवर शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कर्ज माफी झालीचं पाहिजेत, शेतकऱ्याना शेती पंपासाठी पूर्णवेळ विज मिळालीच पाहिजेत, यासाठी लाक्षणिक आंदोलन केले यावेळी विधानसभेतील सर्व महाविकास आघाडीचे आमदार व नेते मंडळी उपस्थित होते. वणी विधानसभेतील आमदार संजय देरकर हे सुद्धा या आंदोलनात सहभागी होते त्यांनी कपासीचे बोंडाने भरलेले झाडच विधीमंडळात वणी विधानसभेचे आमदार देरकर पोहचविले त्यातच ते आंदोलन ही लाक्षणीय आंदोलन ठरले.
“कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा, यासाठी विरोधकांनी आंदोलन केले. राज्यात खरेदी केंद्र कमी स्वरुपात असल्याचं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.”