•झोला शिवारातील घटना
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यांतील परसोडा येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा ऐकून घरी जात असतांना वणी- वरोरा मार्गावरील झोला शिवारात दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटले असता दुभाजकावर जाऊन ठेपली ,या अपघातात जयश्री शंकर उमाटे (४५) रा. कुनुरा ता, भद्रावती ही महिला दुचाकी वरून खाली पडली, व बसच्या चाकाखाली चिरडल्या गेली. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवीत असलेला मृतक महिलेचा मुलगा प्रतीक शंकर उमाटे (२५) व दुचाकी वरील अन्य एक महिला चित्रा सुरेश उमाटे (५५) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना ता ३१ जाने.बुधवारी दुपारी ४ .३० चा वाजताच्या सुमारास घडली.
वरोरा मार्गावरील झोला परीसरात दुचाकी क्रमांक MH-३४ CE- ३१२० या दुचाकीवर उमाटे परिवार जात असताना दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीवरील 1 महिला दुभाजकावर तर दुसरी महीला व दुचाकी चालक रस्त्यावर पडले . मागेच असलेली वणी वरून चंद्रपुरला जाणारी बस क्रमांक MH -१४- HS-८२२७ ही भरधाव वेगाने जात असतांना त्यांना वाचविण्यासाठी ती ही बस दुभाजकावर चढली असता .या अपघातात जयश्री शंकर उमाटे (४५) बसच्या चाकाखाली चिरडल्या गेली. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवीत असलेला मृतक महिलेचा मुलगा प्रतीक शंकर उमाटे (२५) व दुचाकी वरील अन्य एक महिला चित्रा सुरेश उमाटे (५५) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे वणी तालुक्यात कथा ऐकून घरी परत जात असतांनाच हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
घटनास्थळी असलेल्यांनी तात्काळ पोलीसांना कळविले असता पोलिस पथकासह घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी मृतक महीलेच्या जखमीना उपचारार्थ रुग्णालयात हलविले. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.